मी सांगून काटा काढतोय

पुणे : मी एखाद्याचा काटा काढायचा म्हटल्यावर काढतो. मी निवडणुकीत पाडतो; पण एखाद्याला खासदार करायचा म्हटल्यावर करतो; पण तसा तुमच्या शब्दाचा पक्का आहे. पाणी देण्यासाठी मी प्रयत्न करीन, असा शब्द देतो असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. छत्रपती सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या जय भवानी पॅनलच्या प्रचारार्थ अकोले येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

यावेळी त्यांनी सांगितले, खडकवासला कालव्यावरील पाणी गळती रोखण्यासाठी बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी देण्याची गरज आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, खडकवासला कालव्यावरील शेतक-यांना प्रत्येकवेळी पाणी संकटाला सामोरे जावे लागत असल्याने नाराजी वाढत चालली आहे. मात्र, पुणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन उर्वरित पाणी शेतीसाठी देण्याचे नियोजन करण्यात येते. पाणी टेल टू हेड कमी पडत असल्याने मुळशी धरणातून पाणी खडकवासला कालव्याला देण्याचा विचार असून त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी सभेत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक, तसेच निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार व अकोले येथील पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने बंद पाइपलाइनमधून पाणी देऊन, तसेच कालव्याला होणारी गळती थांबवून हेडपर्यंत पाणी देण्याचे नियोजन करण्याचे विचाराधीन आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. खडकवासला कालव्यातून ११०० क्युसेकनी सोडलेले पाणी टेलपर्यंत म्हणजेच इंदापूरपर्यंत २३० क्युसेकनी पोहोचते. यामुळे पाणी गळती रोखून भविष्यात कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी बचत करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले. छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी जय भवानी पॅनलला मतदान देण्याचे आवाहन सभासदांना केले. तसेच कारखाना उसाला चांगला दर कसा देता देईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नमूद केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news