21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरताजीच्या नावाखाली दिली जातेय शिळी मिठाई

ताजीच्या नावाखाली दिली जातेय शिळी मिठाई

लातूर: प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील व शहरातील मिठाई दुकानांत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मिठाई बॉक्सवर तसेच काचेसमोर ‘बेस्ट बिफोर’ तारीख लिहिणे बंधनकारक आहे; मात्र शहर, जिल्ह्यातील मिठाई दुकानांत तसे दिसत नाही. फक्त सणासुदीत तारीख असते अन सण संपल्यानंतर ही तारीख गायब असते. तारीख संपली तरी शिळ्या मिठाईची सर्रासपणे विक्री होत असल्यामुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून सणासुदीच्या दिवसातच काही ठिकाणी कारवाई होते, मात्र पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या ‘प्रमाणे ‘जैसे थे’ परिस्थिती होते. नागरिकांच्या आरोग्यांशी खेळून शिळी मिठाई विकणा-या अशा मिठाई दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
शासनाच्या नव्या नियमांनुसार मिठाई दुकानांत ‘बेस्ट बिफोर’ तारीख लावणे गरजेचे आहे. पूर्वी मिठाईसाठी तारीख लिहिली जात नव्हती. त्यामुळे ग्राहकांना ताजी मिठाई म्हणून शिळी मिठाई मिळत होती. ती मिठाई कधीपर्यंत खाण्यायोग्य आहे याची तारीख लिहिणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील व जिल्ह्यातील मिठाई दुकानदार सणासुदीच्या दिवसातच तारखांचे लेबल लावतात, मात्र सण संपल्यानंतर हे लेबल निघून जाते. ग्राहकांना अशाच प्रकारची शिळी मिठाई खाण्यासाठी दिली जाते. त्यामुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शिळी मिठाई खाल्ल्यास उलट्या, जुलाबा सारखे आजार होऊ शकतात.
फक्त सणातच कारवाई; शिळी मिठाईची विक्री शिळी मिठाई न देता ताजी मिठाई देणे गरजेचे आहे, मात्र तसे होत नाही. नागरिकांच्या जिवाशी खेळू नये. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. अन्न व औषध प्रशासनाने याकडे गांभीयनि लक्ष देऊन अशा मिठाई दुकानदारावर कारवाई करावी, अशी संतप्त मागणी नागरिकांतून होत आहे. लातूर जिल्यात व शहरात दरररोज हजारो नागरिक कुठल्यातरी कारणाने मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करतात. मात्र, अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR