19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeतामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी

तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी

चेन्नई : वृत्तसंस्था
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी शनिवारी मंत्रिमंडळ फेरबदलाची घोषणा केली होती. त्यांच्या शिफारशीवरुन राज्यपाल एन. रवी यांनी अधिसूचना जारी केली. राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार, रविवारी (दि.२९) नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले.

यासह व्ही. सेंथिल बालाजी यांनी पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेतली. व्ही. सेंथिल बालाजी यांना अटक झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांना आता पुन्हा मंत्री करण्यात आले आहे. यासोबतच डॉ. गोवी चेझियान, आर. राजेंद्रन आणि एसएम नस्सर यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या शपथविधीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. स्टॅलिन यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत ‘एआयएडीएमके’ सरकार कोसळले आणि ‘डीएमके’ सरकार सत्तेवर आले. त्यावेळी उदयनिधी स्टॅलिन यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. नंतर २०२२ मध्ये मंत्रिमंडळ फेरबदलात उदयनिधी स्टॅलिन यांना युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री करण्यात आले. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी नुकतीच सहकारी मंत्र्यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार, मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR