24.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeमहाराष्ट्रतीन अपत्ये असणा-यांना हाऊसिंग सोसायटीची निवडणूक लढता येणार नाही

तीन अपत्ये असणा-यांना हाऊसिंग सोसायटीची निवडणूक लढता येणार नाही

हायकोर्टाचा निर्वाळा

मुंबई : प्रतिनिधी
हाऊसिंग सोसायटीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ३ अपत्ये असणा-या व्यक्तीस कोणतीही निवडणूक लढवता येत नाही. या व्यक्तीने माहिती लपवून ठेवत निवडणूक जिंकली तरी, सिद्ध झाल्यास या लोकप्रतिनिधीला अपात्र करण्याचा नियम आहे. हाच नियम गृहनिर्माण निवडणुकीलाही लागू होतो, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. अविनाश घराटे यांच्या एकल पीठाने हा महत्त्वाचा निर्वाळा दिला आहे. तीन अपत्ये असणा-या एका गृहनिर्माण सोसायटीमधील अध्यक्षाला अपात्र ठरवत उपनिबंधकाचा आदेश कायम ठेवला.

या प्रकरणात महाराष्ट्र को-ऑप. हाऊसिंग सोसायटी कायद्यात दोनपेक्षा अधिक अपत्ये असणा-या पदाधिका-याचे पद रद्द करण्याची तरतूद नसल्याचा दावा सिंग यांनी केला होता. मात्र, उपनिबंधकाचे आदेश योग्य असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी केला.

मुंबईतील कांदिवली चारकोपच्या एकता नगर गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष पवनकुमार नंदकिशोर सिंग यांच्या अध्यक्षपदाला दीपक तेजल आणि रामाचल यादव यांनी आव्हान दिले होते. पवनकुमार नंदकिशोर सिंग यांना तीन अपत्ये आहेत. त्यांना अपात्र करण्याची मागणी उपनिबंधकाकडे केली होती. त्यानंतर सिंग यांना अपात्र केले होते. त्यानंतर सिंग यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR