29.8 C
Latur
Wednesday, March 19, 2025
Homeलातूरतीन आरोपींना सहा वर्षांची सक्तमजुरी

तीन आरोपींना सहा वर्षांची सक्तमजुरी

अहमदपूर : प्रतिनिधी
येथील पीग्मी एजंट शेळके यांचा पाठलाग करुन, मारहाण करून एक लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केलेले आरोपी शुभम प्रकाश जाधव वय १९ वर्षे, वसंत शिवाजी वाडीकर वय २१ वर्षे आणि जहीर ईस्माईल शेख वय १८ वर्षे या तीन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायमूर्ती सुरेंद्र वडगावकर यांनी कलम ३९७ भा.द.वी. नुसार सात वर्षे सक्त मजूरी व ३०, हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे व कलम २०१ भा.द.वी. नुसार २ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व दहा दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

आरोपी क्रमांक १ शुभम प्रकाश जाधव वय १९ वर्षे आरोपी क्र. २ वसंत शिवाजी वाडीकर वय २१ वर्षे क्र ३ जहीर ईस्माईल शेख वय १८ वर्षे यांनी दि. ७ ऑक्टोबर २३ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अच्युत अशोक शेळके रा तळेगाव ता. अहमदपूर हे बँकेची पिग्मीची रक्कम घेवून टेंभूर्णी रोडने संत ज्ञानेश्वर नगरमधील घराकडे जात असताना सदरील तीनही आरोपीने दुचाकीवर पाठलाग करून पाठीमागून येवून फिर्यादी अच्युत शेळके यांना रस्त्यावर अडवले व फिर्यादीच्या गळ्यात अडकवलेली पिग्मी गोळा केलेली रकमेची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करू लागले फिर्यादी अच्युत शेळके यांनी प्रतिकार केला असता आरोपीने कोयत्याने हातावर, तोंडावर वार करुन फिर्यादीस जखमी केले.

आरोपी व फिर्यादीच्या झटापटीमध्ये पिग्मीची रक्कम असलेल्या बॅगमधील एक लाख रूपये घेऊन तीन्ही आरोपी हे दुचाकीवर घटनास्थळावरून पसार झाले होते. फिर्यादी अच्युत शेळके यांनी आरडा ओरड केल्याने बरेच लोक जमा झाले. त्यातील काही जणांनी पोलीसांना फोन करून बोलावले व पुढील उपचारा करीता जखमी फिर्यादी अच्युत शेळके यांना खाजगी दवाखाण्यात उपचारासाठी दाखल केले. जखमी फिर्यादी अच्युत शेळके यांच्या जवाबावरून अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलीसांनी तपासाचे चक्र फिरवून आरोपींचा शोध घेऊन तीन्ही आरोपींना ताब्यात घेवून अहमदपूर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ५७७/ २०२३ कलम ३९७,३९४,२०१ सह कलम ३४ भा.द.वी. नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासिक अधिकारी व्ही.पी. सूर्यवंशी (सपोनी) यांनी योग्य तपास करुन अहमदपूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ज्याचा खटला क्र. १६/२०२४ महाराष्ट्र शासन वि. शुभम व इतर.सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यामध्ये फिर्यादी, वैदयकीय अधिकारी व तपासिक अधिकारी व्ही.पी. सूर्यवंशी व बालाजी पुट्टेवाड पोकॉ. यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

जिल्हा व सत्र न्यायाधिश सुरेंद्र वडगावकर यांनी प्रकरणाच्या सुनावणी अंती सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेला पुरावा ग्रा धरुन तीन्ही आरोपीतांस कलम ३९७ भा.द.वी. नुसार सात वर्षे सक्तमजुरी व ३०,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कलम २०१ भा.द.वी. नुसार २ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या खटल्यामध्ये सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील महेश पाटील यांनी काम पाहीले. महेश पाटील यांना जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांचे मोलाचे मागदर्शन लाभले. तसेच पोलीस पैरवीकार पोलीस हेडकॉन्स्टेबल गोविंद पवार बक्कल नं.११२८ व पो.कॉ. राजगीरवाड यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR