22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रथंडी गायब; ऊबदार कपड्यांच्या मार्केटला झळ

थंडी गायब; ऊबदार कपड्यांच्या मार्केटला झळ

छत्रपती संभाजीनगर – थंडीची चाहूल लागताच शहरवासीय मध्यवर्ती बसस्थानकाजवळील तिबेटियन मार्केटमध्ये ऊबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी करतात. मात्र, नोव्हेंबर महिना संपत आला तरी पुरेशी थंडी जाणवत नाही. याची झळ ऊबदार कपडे विक्री करणा-यांना बसत आहे. यंदा थंडी कमी राहिली तर ग्राहकांची संख्या घटण्याची शक्यता आहे.

आजमितीला तिबेटियन बाजारात दैनंदिन सरासरी केवळ ४ ते ५ ऊबदार कपड्यांची विक्री होत आहे. ब-यापैकी थंडीचा मोसम सुरू झाल्यास हीच संख्या ५० ते ६० वर जाऊ शकते, असे विक्रेत्यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून तिबेटियन मार्केटमध्ये एकूण ५० स्टॉल लावण्यात आले आहेत. तर गतवर्षी मालाची विक्री होऊनही काही माल तसाच उरला आहे.

मात्र, यावेळी देखील अशीच परिस्थिती कायम राहिल्यास, भरपूर माल उरणार असल्याची शक्यता व्यापा-यांनी व्यक्त केली. हे स्टॉल्स जानेवारी अंतिमपर्यंत सुरू राहतील. यंदा काही ऊबदार कपड्यांचे दर कमी झाले तर काहींचा दर तोच ठेवल्याची माहिती तिबेटियन स्वेटर विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष एस. डी. चौबेल यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR