22.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूर‘दक्ष’आपत्ती व्यवस्थापन परिषदेत डॉ. उस्मानी सन्मानीत

‘दक्ष’आपत्ती व्यवस्थापन परिषदेत डॉ. उस्मानी सन्मानीत

लातूर : प्रतिनिधी
आपत्ती व्यवस्थापनामध्ये आणीबाणीच्या वेळी योग्य निर्णय घेऊन तात्काळ प्रतिसादाच्या सेवेसाठी लातूरचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी यांना छत्रपती संभाजीनगर येथे सन्मानित करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सभागृहात दि. ५ सप्टेंबर रोजी आयोजित ‘दक्ष’ विभागीय आपत्ती व्यवस्थापन परिषद २०२४ मध्ये हा सन्मान करण्यात आला.

पारिषदेचे उद्घाटन विभागीय आयुक्त्त दिलीप गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी काही प्रमुख अधिका-यांचा उल्लेखनीय कार्यासाठी सत्कार करण्यात आला. यामध्ये लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी यांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विभागीय आयुक्त्त दिलीप गावडे यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR