दगा, फटका बसण्याची भिती; अनेक सदस्य सुरक्षीत ठिकाणी हलवले

मच्छिंद्र कदम
धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक मतमोजणी सोमवारी (दि.९) जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या ठिकाणी पार पडली. या निवडणुकीत महायुतीमधील भाजप शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला ५५ पैकी ४० जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. असे असले तरी महायुतीमधील शिवसेना पक्षाचे आ. तानाजी सावंत यांना त्यांच्या मतदार संघात मित्र पक्ष असलेल्या भाजपाने नगरपालिका निवडणूक असो की जिल्हा परिषद, पंचायत समिती एकाकी पाडले आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेत ते भाजपाला धडा शिकविण्यासाठी वेगळी चाल खेळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विशेषत: त्यांचे भूम, परंडा, वाशी तालुक्यातील शिवसेनेच्या सदस्यांची भूमिका वेगळी असण्याची शक्यता आहे. त्यास पुष्टी म्हणून की काय, कमी सदस्यसंख्या असलेल्या ठाकरे सेनेनेही आपले सदस्य सुरक्षीत ठिकाणी हलवले आहे. त्यामुळे कुछ तो गडबड हे, अशी चर्चा जिल्ह्यात सुरु असून जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही काही दगा, फटका होवून नये, या भितीने भाजपा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही आपले सदस्य सुरक्षीत ठिकाणी हलविले आहेत. तसेच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे सदस्यही त्यांनी सोबत घेतल्याची माहिती कळत आहे. याशिवाय सत्तासमीकरण जुळविण्यासाठी अपक्षही गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जिल्हा परिषद निवडणूकीत भारतीय जनता पक्षास १९ जागा, शिवसेना पक्षास १५ जागा, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष ०६, शिवसेना ठाकरे पक्ष ०७, राष्ट्रीय काँग्रेस ०३, समाजवादी पक्ष ०१ तर अपक्ष ४ अशी एकूण ५५ सदस्यसंख्या आहेत. अध्यक्ष होण्यासाठी किमान २८ सदस्यांचे बहुमत होण्याची आवश्यकता आहे.

तेवढा आकडा कोणत्याच एकट्या पक्षाकडे नाही. त्यामुळे महायुतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडे १५ सदस्य संख्येच्या जोरावर ते विरोधातील सदस्यांना सोबत घेवून आपला अध्यक्ष जिल्हा परिषदेत बसवू शकतात. विशेष म्हणजे आ. तानाजी सावंत यांनी भाजपा आ. पाटील यांना पालिका निवडणूकीतील धडा शिकवण्यासाठी ही खेळी करु शकतील अशी चर्चा जिल्ह्यात जोरात सुरु आहे. त्याचे कारण म्हणजे आ. सावंत यांनी या निवडणूकीत प्रचारादरम्यान अनेकवेळा ही बाब बोलूनही दाखवलेली आहे.

त्यामुळे शिवसेनेचे १५ सदस्य अधिक त्यांनी ठाकरे सेना, कॉग्रेस व अपक्षांना सोबत घेतले तरी ते अध्यक्षपदासाठीचा बहुमताचा आकडा गाठू शकतील. तशी रणनिती आखली जात असल्याचेही जोरदार चर्चा सुरु आहेत. आ. सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचे एबी फॉर्म वाटपावरुन भाजपा आ. पाटील यांच्यावर त्यांनी नाव न घेता अनेकवेळा टिकाही केली आहे. त्यामुळे भाजपाला जिल्हा परिषदेत सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी त्यांची ही रणनिती असू शकते, अशी चर्चाही आता जोरात सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षाकडून आपआपले उमेदवार सुरक्षीत ठिकाणी हलविण्याची प्रक्रीया सुरु केली आहे हेच यावरुन स्पष्ट होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news