24.4 C
Latur
Friday, February 27, 2026
Homeलातूर‘दयानंद कला’मध्ये फ्युजन २०२६ राज्यस्तरीय फॅशन शो स्पर्धा

‘दयानंद कला’मध्ये फ्युजन २०२६ राज्यस्तरीय फॅशन शो स्पर्धा

लातूर : प्रतिनिधी
दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथील फॅशन आणि ड्रेस डिझाइन विभागाच्या वतीने दिमाखदार ‘फ्युजन २०२६’ राज्यस्तरीय फॅशन शो स्पर्धा संपन्न झाली. या फैशन शो स्पर्धेचे संगीता लाहोटी यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने दिमाखदार उद्घाटन झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. सौ. पद्मा तोष्णीवाल-बियाणी, परीक्षक वसुधा माने, श्रध्दा सोनटक्के, विशाल अग्रवाल, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, आयक्यूएसी समन्वयक डॉ. संतोष पाटील, सौ. स्मिता विशाल अग्रवाल, सौ. देवकन्या सागर मंत्री, सौ.निकेता चैतन्य भार्गव, सुश्री शांता जैन, जयमाला शिवाजी गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
महाराष्ट्रातील २२ महाविद्यालयांमधून २६० युवक-युवतींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध सत्रे व फे-यांमधून ही स्पर्धा अत्यंत रंगतदार झाली. स्पर्धक विद्यार्थ्यांनी केवळ आकर्षक वेशभूषांची निर्मितीच केली नाही, तर आत्मविश्वासाने कॅटवॉक करत प्रभावी सादरीकरणातून प्रेक्षकांची मने जिंकली. ही स्पर्धा युवक-युवतींसाठी करिअरच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरली.
महाविद्यालयात फैशन आणि ड्रेस डिझाईन विभाग मागील १५ वर्षांपासून  बी. ए. व एम. ए. वर्गासाठी अविरतपणे अत्याधुनिक फॅशन आणि ड्रेस डिझाईन विषयाचे शिक्षण देत आहे. येथून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी स्वत:च्या पायावर यशस्वी उद्योजक म्हणून कार्य करीत  आहेत. स्पर्धकांना प्रथम पारितोषक ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार व तृतीय ५ हजार रूपये त्याचबरोबर प्रत्येक थीमनुसार प्रथम १००० द्वितीय ७०० व तृतीय ५०० असे एकूण २५ भरघोस बक्षिसे, ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात आले. दयानंद कला महाविद्यालयाच्या फॅशन आणि ड्रेस डिझाइन विभागाने साकारलेला हा उपक्रम नेत्रदीपक व अविस्मरणीय ठरला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR