दयानंद शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान महाविद्यालयास ‘ओ’ ग्रेड

लातूर : प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारे नुकतेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ या आपल्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांचे ‘ट्रिपल ए’ म्हणजेच ऑनलाईन अकॅडमीक अंकेक्षण तपासणी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या प्रक्रियेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चास्कर, प्र कुलगुरू डॉ. अशोक महाजन, सहसंचालक डॉ बाबासाहेब भोसले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. विद्यापीठाच्या अधिकृत परिपत्रकाचा आधार घेऊन जाहीर झालेल्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या ऑडिट निकालात लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा सुवर्णकलश रोवत संपूर्ण विद्यापीठ कार्यक्षेत्रात अव्वल स्थान सिद्ध केले आहे.  विद्यापीठ कार्यक्षेत्रातून या ऑनलाईन अकॅडमीक ऑडिट प्रक्रियेमध्ये एकूण ७२ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. विद्यापीठ प्राधिकरणाच्या मान्यतेने जाहीर झालेल्या या गुणांकन पद्धतीमध्ये केवळ अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करणा-या मोजक्याच महाविद्यालयांना सर्वोच्च ‘ओ’ ग्रेड बहुमान प्राप्त झाला आहे.
संपूर्ण ७२ महाविद्यालयांपैकी अवघ्या ५ महाविद्यालयांना हा सर्वोच्च दर्जा प्राप्त करता आला असून, अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची बाब म्हणजे या ५ पैकी तब्बल २ महाविद्यालये एकट्या दयानंद शिक्षण संस्थेची आहेत. संस्थेचे दयानंद कला महाविद्यालय आणि दयानंद विज्ञान महाविद्यालय यांनी आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक, पायाभूत व प्रशासकीय कामकाजच्या जोरावर  विद्यापीठात सर्वोच्च ‘ओ’ ग्रेड पटकावला  आहे.
या पार्श्वभूमीवर दयानंद शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांनी मिळवलेला सर्वोच्च ‘ओ’ ग्रेड हा शैक्षणिक पारदर्शकतेचा आणि गुणवत्तेचा बालेकिल्ला अधिक मजबूत करणारा ठरला आहे. महाविद्यालयांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व व ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण शैक्षणिक वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. संस्थेच्या निरंतर पाठबळामुळे आणि प्रेरणेमुळेच दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन हा बहुमान प्राप्त केला आहे. या यशामुळे दयानंद शिक्षण संस्थेच्या उच्च शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा पुन्हा एकदा महाराष्ट्रात अधोरेखित झाला आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष ललितकुमार  शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, विशाल लाहोटी, अ‍ॅड. श्रीकांत उटगे, अजिंक्य सोनवणे, संजय  बोरा, पदाधिकारी, व्यवस्थापन मंडळ यांच्या खंबीर व दूरदृष्टी नेतृत्वाला तसेच मार्गदर्शनाला जाते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

सेविका, मदतनिस होणार बडतर्फ 

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा संप...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
नांदेडमध्ये काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात हल्लाबोल;बैलगाडीतून दुचाकी नेत काँग्रेसचं अनोखं आंदोलन
02:09
Video thumbnail
Himayatnagar|नगराध्यक्ष उतरले थेट श्रमदानात!;हिमायतनगरच्या पाणीप्रश्नावर तोडगा
01:37
Video thumbnail
Latur\खंडापूर सप्ताहातील दानरक्कम घेऊन महाराज गायब?;“किशोर महाराजांना अटक करा” ; वारकऱ्यांचा आक्रोश
02:52
Video thumbnail
Latur|लातुरात शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा; २५ हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
07:20
Video thumbnail
घरच्या घरी श्रद्धा कपूरचा फ्री-स्टाईल डान्स; 'त्या' एका टॅगमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण!
00:43
Video thumbnail
समृद्धी महामार्गावर ईव्ही कारला भीषण आग; काही मिनिटांतच गाडी जळून खाक.
00:30
Video thumbnail
Latur|गावठी पिस्तुलासह आरोपी अटकेत!;MIDC पोलिसांची धडक कारवाई
02:16
Video thumbnail
Latur|आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते नूतन शराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पदग्रहण सोहळा संपन्न.
06:06
Video thumbnail
REEL STAR|रील्स बनवणारी तरुणी निघाली चोर?एलसीबीची मोठी कारवाई
02:19
Video thumbnail
BIG BREAKING|खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याचा अपघात;चार गाड्या एकमेकांवर आदळल्या
00:58
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची आणखी एक मोठी कारवाई;शिवराज मोटेगावकर यांचे बँक लॉकर सील
03:00
Video thumbnail
nanded|आमदार चिखलीकरांनी मध्यरात्री घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट
04:20
Video thumbnail
Nanded|श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय: नांदेडमध्ये शिवसैनिकांची गर्दी!
03:40
Video thumbnail
जळकोट तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबल्याने शेतकरी हवालदिल
02:12
Video thumbnail
Shivraj Motegavkar|खोपेगाव शिवारातील कोटींची इमारत चर्चेत;प्रशासनाच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह?
02:39

Latest news