26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeलातूरदरोडा टाकण्याच्या तयारीतील चार जण जेरबंद

दरोडा टाकण्याच्या तयारीतील चार जण जेरबंद

निलंगा :  प्रतिनिधी
निलंगा ते हडगा जाणा-या रोडवरील येडेश्वरी मंदिरासमोर उभे असलेल्या बँक आणि सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील खूनाच्या गुन्ह्यातील ४ आरोपींसह, २ पीस्टल, १७ जीवंत  काडतुसे, १ खंजर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील पथक निलंगा भागात गस्तीवर असताना काही संशयित इसम हत्यारासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त महिती बातमीदारांकडून मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि १२ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास निलंगा ते हाडगा जाणा-या रोडवरील येडेश्वरी मंदिरासमोर उभा राहिलेले संशयित इसमांना अचानक गाटून गाडीची व झडती घेतली असता आरोपी नामे मयुर नितीन आवचारे वय २६ वर्षे, अक्षय रामदास टेकाळे वय २१ वर्षे रा. काटीपुरम चौक ंिपपळे गुरव सांगवी, पुणे, विलसन ऊर्फ अविनाश पाथीराज डिमेंन्टी वय ३१ वर्षे रा. काटीपुरम चौक ंिपपळे गुरव सांगवी, पुणे,  निशांत राजेंद्र जगताप वय ३१ ‘वर्षे रा. बोपोडी सर्वे नंबर २६ भाऊ पाटील रोड, पुणे, हे दरोड्याच्या तयारीत असल्याचे निदर्शन आले. तर शाम गायकवाड अंदाजे वय २६ वर्षे रा. बामणी ता. निलंगा जि. लातूर हा  फरार आहे. या आरोपीकडून पस्टल-२, जिवंत काडतुस-१७. खंजर-१, एक पांढ-या रंगाच्या टाटा पंच गाडी क्रमांक एमएच १४ एलजे ३१६९ गाडी व मिरची पावडरसह एकूणकिंमत १३६४३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कलम ३९९, ४०२, १२०(ब), भादविसह कलम ३ (१) २५, ७ (अ)/ २५ शस्त्र अधिनियम १९५९ प्रमाणे निलंगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR