दिग्गजांना धक्का!

यंदाच्या फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये एकाच वेळी खेळवली जाणारी ही स्पर्धा सुरुवातीपासूनच मोठी रंगतदार ठरली आहे. ४८ संघांच्या नव्या फॉरमॅटमुळे प्रत्येक सामना रोमांचक झाला. बलाढ्य संघांना प्रत्येक टप्प्यावर कठीण आव्हानांचा सामना करावा लागला. त्यामुळे फिफा विश्वकप २०२६ ही केवळ विश्वचषक स्पर्धा न राहता फुटबॉलमधील बदलत्या समीकरणांची मोठी कहाणी बनली. यंदाच्या स्पर्धेत जर्मनी, ब्राझील, पोर्तुगाल आणि नेदरलँड या दिग्गज संघांचे अनपेक्षित पराभव सर्वांनाच धक्का देणारे ठरले. पॅराग्वे, नॉर्वे, मोरोक्को, बेल्जियम आणि केप व्हर्डे या संघांनी आपल्या दमदार खेळाने जगभरातील फुटबॉल रसिकांचे लक्ष वेधून घेतले.

४८ संघांच्या नव्या फॉरमॅटमुळे प्रत्येक सामन्यात नवा ट्विस्ट पहायला मिळाला. त्यामुळे कोणता संघ विजेता ठरेल ते निश्चितपणे सांगणे अवघड झाले. विशेष म्हणजे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे तिन्ही यजमान देश स्पर्धेबाहेर गेले आहेत. यंदाच्या स्पर्धेचा भावनिक पैलू म्हणजे अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीचा हा अखेरचा विश्वचषक आहे. आणखी एक दिग्गज फुटबॉलपटू पोर्तुगालचा रोनाल्डो याच्यासाठीही ही अखेरची स्पर्धा ठरली. त्याचा संघ पराभूत झाल्याने विश्व विजेतेपदाचे रोनाल्डोचे स्वप्न अधुरे राहिले. या दोघांसाठीही प्रत्येक सामना भावनिक आणि संस्मरणीय ठरला. मेस्सीचे आव्हान अजून कायम आहे. ही स्पर्धा संस्मरणीय ठरवण्याची त्याला संधी आहे. यंदाच्या स्पर्धेच्या विजेतेपदाचे दावेदार म्हणून फ्रान्स, स्पेन आणि अर्जेंटिना या संघांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. फ्रान्स, अर्जेंटिना आणि स्पेन संघांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे उपान्त्यपूर्व फेरीतील लढती अधिक रंगतदार बनल्या. डार्क हॉर्स गणला गेलेला बेल्जियम, मोरोक्को संघाची झुंज, नॉर्वे संघाचा आत्मविश्वास आणि नवख्या केप व्हर्डेचा ऐतिहासिक प्रवास यामुळे या विश्वचषकाची अखेर नेमक्या कोणत्या संघाच्या विजयाने होईल ते सांगता येत नाही. जगभरात कुठेही नाव नसलेल्या केप व्हर्डे

या अवघी ५ लाख लोकसंख्या असलेल्या देशाने जगभरातील फुटबॉलप्रेमींची मने जिंकली आहेत. हा संघ स्पर्धेबाहेर गेला असला तरी या संघाने शानदार खेळाचे जे दर्शन घडवले त्याबद्दल त्या देशात जल्लोष सुरू असून संघाच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली आहे. यंदाची स्पर्धा अनेक कारणांमुळे खास ठरणार आहे. यंदा प्रथमच ४८ संघांचा स्पर्धेत समावेश करण्यात आला असून एकूण १०४ सामने खेळवले जात आहेत. स्पर्धा ११ जूनला सुरू झाली असून १९ जुलैला समाप्त होणार आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमधील १६ शहरांमध्ये सामने खेळवले जात असल्याने यंदाचा विश्वचषक भौगोलिकदृष्ट्याही सर्वांत मोठा मानला जात आहे. केप व्हर्डे, कुरासाओ, जॉर्डन आणि उझबेकिस्तानसारख्या नवोदित संघांना पहिल्यांदाच विश्वचषकाच्या मुख्य रंगमंचावर खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे स्पर्धेत बलाढ्य संघांइतकेच नव्या संघांचेही प्रदर्शन चर्चेचा विषय ठरले. यंदाच्या स्पर्धेत केवळ संघ संख्या वाढलेली नाही, तर एआय तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. ऑफसाईड तंत्रज्ञान, कनेक्टेड बॉल, गोल-लाईन टेक्नॉलॉजी आणि रेफरी (पंच) कॅमे-यामुळे निर्णय अधिक वेगाने आणि अचूक घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मात्र, तंत्रज्ञान असूनही काही निर्णयांवर वाद झाले आणि त्यावरून चर्चा रंगली. अर्जेंटिना-ईजिप्त सामन्यात हा वाद अधिक उफाळून आला. पंचाच्या पक्षपाती निर्णयाचा आम्हाला फटका बसला अशी तक्रार ईजिप्त संघाने फिफाकडे केली आहे. त्यामुळे जितकी चर्चा रोमांचक सामन्यांची झाली, तितकीच एआय तंत्रज्ञान आणि पंचांच्या निर्णयांचीही झाली. सर्वांत जास्त चर्चा झाली ती मोठ्या उलथापालथींची.अनेक बलाढ्य संघ अपेक्षेपेक्षा खूप लवकर स्पर्धेबाहेर गेले, तर कमी अनुभवी संघांनी आपल्या दमदार खेळाने जगभरातील चाहत्यांची मने जिंकली. प्रत्येक फेरीत नवा निकाल आणि नवा हिरो पहायला मिळाल्याने ही स्पर्धा अधिकच रोमांचक बनली आहे. सर्वांत मोठा धक्का जर्मन संघाला बसला. पॅराग्वेविरुद्धचा सामना निर्धारित वेळेत १-१ असा बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये पॅराग्वेने ४-३ असा विजय मिळवत जर्मनीला स्पर्धेबाहेर पाठवले. अनेक फुटबॉलतज्ज्ञांनी या निकालाला यंदाच्या स्पर्धेतील सर्वांत मोठ्या आश्चर्यापैकी एक मानले आहे. जर्मनीची गच्छन्ती ही केवळ पराभवाची बातमी नव्हती, तर नव्या जर्मन पिढीकडून असलेल्या मोठ्या अपेक्षांना मोठा धक्का होता. ब्राझीलचेही तसेच! नॉर्वेने २-१ अशा फरकाने ब्राझीलला स्पर्धेबाहेर केले ही स्पर्धेतील सर्वांत मोठी चर्चेची घटना ठरली. ब्राझील संघात नेमार, विनिसियस ज्युनियरसारखे स्टार खेळाडू असूनही ब्राझीलला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

नेमारने तर फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. नॉर्वेने शांत, संयमी आणि शिस्तबद्ध खेळ करत इतिहास रचला. मोरोक्कोने नेदरलँडला पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ असे पराभूत केले तर बेल्जियमने अमेरिकेवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला. या धक्कादायक निकालांनी एक गोष्ट स्पष्ट झाली की, विश्वकप स्पर्धेत केवळ मोठे नाव किंवा जुना इतिहास महत्त्वाचा नाही, तर योग्य रणनीती, मानसिक ताकद आणि निर्णायक क्षणी शांत राहणारा संघच पुढे जातो. यंदाच्या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी शानदार कामगिरी करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. काही दिग्गज तर काही नव्या खेळाडूंनी फुटबॉल विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. लिओनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पे, एर्लिंग हालांड, हॅरी केन या खेळाडूंनी चमकदार खेळ दाखवला आहे. केप व्हर्डेचा ४० वर्षीय गोलरक्षक वोटजिन्हाने अप्रतिम गोलरक्षण करून तरुणांना लाजवेल असे प्रदर्शन केले. गोल्डन बूटसाठी मेस्सी आणि एम्बाप्पेमध्ये स्पर्धा आहे. फ्रान्स, स्पेन आणि अर्जेंटिनाकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:57
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
24:13
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53

Latest news