दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी इंजेक्शनचा वापर!

म्हशीच्या गोठ्यावर धाड, कारवाईत बंदी घातलेले ६१२ ऑक्सिटोसिन इंजेक्शन जप्त

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नातील भेसळ आणि बेकायदेशीर औषधांचा वापर करणा-यांविरोधात धडक मोहीम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये एक मोठी कारवाई समोर आली. म्हशींचे दूध उत्पादन वाढविण्यासाठी बेकायदेशीरपणे दिली जाणारी आणि शासनाने बंदी घातलेली तब्बल ६१२ ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स एफडीएच्या पथकाने जप्त केली.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ मधील ओटी सेक्शन, जसलोक हायस्कूल परिसरात असलेल्या प्रकाश वाधवानी याच्या म्हशीच्या गोठ्यावर एफडीएच्या पथकाने शनिवारी छापा टाकला. या छाप्यात जास्त दुधासाठी जनावरांना टोचली जाणारी ६१२ प्रतिबंधित इंजेक्शन्स आणि त्यासाठी वापरण्यात येणा-या प्लास्टिकच्या बाटल्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

ऑक्सिटोसिन या औषधाचा वापर जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि क्रूर मानला जातो. या इंजेक्शन्समुळे जनावरांना प्रचंड त्रास होतो. इतकेच नाही तर अशा प्रकारे ऑक्सिटोसिन देऊन काढलेल्या दुधाचे सेवन केल्यास मानवी आरोग्यावर, विशेषत: लहान मुलांवर आणि गरोदर महिलांवर गंभीर दुष्परिणाम होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याच कारणामुळे या औषधाच्या विक्रीवर आणि वापरावर शासनाने कायद्याने पूर्णपणे बंदी घातली आहे. असे असतानाही आघोरीपणाने पैसे कमावण्याच्या हव्यासातून बेकायदेशीरपणे अशा इंजेक्शनचा वापर करून दूध उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. हे अत्यंत धक्कादायक असून, दूध विष तर बनले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

तबेला चालकावर
कठोर कारवाई
बेकायदेशीरपणे औषधांचा साठा बाळगल्या प्रकरणी आणि जनावरांच्या आरोग्याशी खेळ केल्या प्रकरणी आता गोठा चालकावर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली. एफडीएच्या या धडक कारवाईमुळे उल्हासनगर आणि ठाणे जिल्ह्यातील बेकायदेशीर दुग्ध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
11:29
Video thumbnail
Latur|पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
04:24
Video thumbnail
Nanded|बिलोलीत आयशर चालकाला बेदम मारहाण! VIDEO व्हायरल
01:12
Video thumbnail
Nanded|शिवणी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत? 100-150 रुग्णांची गैरसोय
01:58
Video thumbnail
Latur|ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
05:21
Video thumbnail
Latur|लातूर जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात चोरी; पोलिसांसमोर मोठं आव्हान
06:55
Video thumbnail
Latur|पिकं संकटात, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न; छावा संघटनेचं उपोषण
10:32
Video thumbnail
Nanded|घंटानादाने सरकारला जागं करण्याचा प्रयत्न; नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन
03:04
Video thumbnail
Nanded|दौरे नकोत, शेतकऱ्यांना मदत द्या’; रोहित पवारांची सरकारकडे मागणी
02:48
Video thumbnail
Latur|रेणापूर तालुक्यातील शेरा, समसापूर, गव्हाण येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी
02:12
Video thumbnail
Nanded|पलंगावर झोपला अन् विषारी सापाने दंश केला; १७ वर्षीय रिहानचा मृत्यू
01:46
Video thumbnail
Dharashiv Rain Update|वाशीत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, तेरखेड्यात गारपीट
01:20
Video thumbnail
Rohit Pawar|‘मोबाईलवर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा’; रोहित पवारांचा संताप
05:26
Video thumbnail
Rohit Pawar|रोहित पवारांसमोर शेतकऱ्याचा हंबरडा; अश्रूंनी मांडली व्यथा
02:01
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
04:49

Latest news