19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeउद्योगदुबईच्या राजकुमारीचा ‘डिव्होर्स’ परफ्यूम!

दुबईच्या राजकुमारीचा ‘डिव्होर्स’ परफ्यूम!

भन्नाट! पतीला दिला तलाक, प्रेमभंगानंतर शेखा महराने लढविली बिझनेस आयडिया

दुबई : वृत्तसंस्था
प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी बरेच पराक्रम करतात. पण, दुबईचे राजे मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या मुलीने म्हणजे राजकुमारी शेखा महराने एक भन्नाट आयडिया लढविली.

दुबईची राजकुमारी शेखा महराने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून पतीला तलाक दिला होता. त्यानंतर शेखा महराने नवी पोस्ट केली आहे. ही पोस्ट नवीन परफ्यूमबद्दल आहे. या परफ्यूमच्या नावानेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राजकुमारी शेखा महराने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. परफ्यूमचा फोटो असून, ‘डिव्होर्स बाय महरा एम १’ असे पोस्टमध्ये म्हटले आहे. गडद काळ्या रंगाची डिव्होर्स परफ्यूम बॉटल आहे.

एक यूजरने म्हटले आहे की, या परफ्यूममध्ये स्वातंत्र्याचा सुगंध असेल, असे विश्वासाने सांगू शकतो. तर दुस-या यूजरने म्हटले आहे, काय क्रिएटिव्हीटी आहे. ही पोस्ट बघून तुमच्या घटस्फोटित पतीचा तिळपापड झाला असेल. अशा आशयाच्या कमेंट या पोस्टवर लोक करत आहेत.

शेखा महरा यांनी सोशल मीडियावरून तलाक दिल्याच्या घटनेने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. पुरुषांना तलाक देण्याच्या पद्धतीचे अनेकांनी समर्थन केले होते. शेखा महरा यांनी तलाक देतानाच पतीला अनफॉलो केले. इतकेच नाही, तर पतीसोबतच्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्या. एका वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला, तिला एक मुलगी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR