28.4 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeलातूरदेवणी तालुक्यात अतिवृष्टी; ८२.३३ मि.मी.ची नोंद

देवणी तालुक्यात अतिवृष्टी; ८२.३३ मि.मी.ची नोंद

देवणी : प्रतिनिधी
देवणी तालुक्यात जूनच्या पाहल्या आठवड्यापासून मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच
पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे ओढे, नाली ओसंडून वाहू लागले आहेत. शेत शिवार जलमय झाल्याने  शेतक-यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
या पावसामुळे शेतक-यांच्या खरीप पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खरीप हंगामात पाऊस वेळेवर पडणार की असा प्रश्न उपस्थित केला जात होता.पण जूनच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजे मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे.  दरम्यान शेतकरी बांधवांनी जून महिन्यापूर्वीच खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून खरीप पेरणीसाठी तयारी केली आहे. या वर्षी खरीप हंगामात पाऊस वेळेवर आल्याने समाधान वाटत असून लवकरच पेरणीला सुरुवात करणार आहोत, असे शेतकरी संदीप जगताप यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR