13 C
Latur
Friday, November 29, 2024
Homeराष्ट्रीयदेशाला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनविणार

देशाला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनविणार

शिव्या खाणारा हुकुमशहा असतो का?, मोदींचा सवाल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आपल्यावर सातत्याने हुकूमशहा असल्याचा आरोप केला जात आहे. अनेकदा अपमानही केला जातो. पण जगातला कोणता हुकूमशहा इतरांच्या शिव्या खातो, शिव्या खाणारा हुकूमशहा कुठे असतो का असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. तसेच येत्या काळात देशाला जगातील तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवणार असून त्याचा रोडमॅप तयार असल्याचे मोदी म्हणाले.

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते. विरोधक मला हुकूमशहा म्हणतात आणि शिव्या देतात. हुकूमशहाचे इतके अवमूल्यन झाले आहे कुठे होते का, लहानपणापासून मला अपमान सहन करण्याची सवय आहे. मी नेहमी म्हणतो की विरोधक नामदार आहेत आणि मी कामदार आहे, असेही मोदी म्हणाले.

जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या रोडमॅपच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, याआधी देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती, ती आता आम्ही पाचव्या स्थानी आणली. त्यामुळे देशात काय घडते ते पाहणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी किती किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आला होता, यापूर्वी गरिबांसाठी किती घरे बांधली गेली? गरिबांना पूर्वी किती धान्य मिळाले, यापूर्वी गरिबांना आरोग्यासाठी कोणत्या सुविधा मिळत होत्या, आज तुम्हाला किती मिळतात, कोणत्याही पॅरामीटरवरून ते पाहा. जेव्हा अर्थव्यवस्था वाढते, तेव्हा तुमच्याकडे कार्यक्षमता असते. आपण ते चांगले वितरित करू शकतो. जेव्हा अर्थव्यवस्था ११ वरून ५ वर जाते, तेव्हा तुमचे महत्व वाढते. जर ती आता पाचवरून तिस-या स्थानी पोहोचली तर भारताची शक्ती वाढेल. यामुळे जगाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.

निकालाच्या दिवशी अलिप्त मूडमध्ये
निकालाच्या दिवशी माझ्या खोलीत कोणीही प्रवेश करत नाही. २००२ मध्ये गुजरातमध्ये निवडणुका होत्या. एक वाजता माझ्या घराबाहेर ढोल वाजायला सुरुवात झाली. पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला भेटायचे आहे, असे पत्र मला आले. मग मला कळले की निकाल काय आला असेल. त्यानंतर निकाल साजरा करण्यात आला. निकालाच्या दिवशी मी अलिप्त मूडमध्ये असतो. मी ट्रेंडकडे लक्ष देत नाही आणि परिणामांकडे लक्ष देत नाही, असे मोदी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR