21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरदेशाला शिक्षणाचा पॅटर्न देणारे लातूरकर निवडणूकीत ‘उत्तीर्ण

देशाला शिक्षणाचा पॅटर्न देणारे लातूरकर निवडणूकीत ‘उत्तीर्ण

लातूर : विनोद उगीले
साक्षरता अभियानाच्या माध्यमातून निरक्षरतेचा ठपका पुसून काढणा-या तसेच देशाला शिक्षणाचा ‘लातूर पॅटर्न’ देणा-या लातूर जिल्हा वासीयांची ख-या अर्थाने लोकसभा निवडणुकीत परीक्षा पार पडली लोकसभा निवडणूकीत लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये अल्पशिक्षित उमेदवारांविरोधात उच्च शिक्षित उमेदवारांची लढत झालीे. लातूरकर अल्पशिक्षित का? उच शिक्षित उमेदवारांना ‘पास’ करतात. याकडे संपूर्ण राज्याचे, देशाचे लक्ष लागले होते. या निवडणूकीच्या परिक्षेत लातूरकर ख-या अर्थाने उतिर्ण झाले असून अल्पशिक्षित विघमान खासदार सुधाकर शृंगारे यांना नापास करत उच्यशिक्षित डॉ. शिवाजी काळगे यांना पास केले
आहे.
एकेकाळी लातूर जिल्ह्यात निरक्षरतेचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात होते. हा निरक्षरतेचा ठपका लातूर जिल्हा वासीयांनी शासनाच्या साक्षरता अभियानाला प्रतिसाद देत पुसून काढला होता तर आज याच लातूर जिल्ह्याने शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी करत लातूरचे नाव मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात, देशात पोहोचवत देशाला शिक्षणाचा ‘लातूर पॅटर्न’ दिला आहे. आज देशभरात ‘लातूर पॅटर्न’ मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे. शिवाय शिक्षणाचे धडे घेण्यासाठी राज्यातून, देशातून प्रत्येक वर्षी हजारो विद्यार्थी लातूरात दाखल होत  आहेत.
तर लातूरने जिल्ह्याला, राज्याला, देशाला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराब देशमुख, माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. धीरज विलासराव देशमुख यांच्यासह आदी उच्च शिक्षित नेतेमंडळी दिले आहेत. यातून लातूर जिल्हावासीय किती ‘हुशार आहेत हेही यातून स्पष्ट होते. देशभरात नुकतीच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडली व मंगळवारी मतमोजणीची ही प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे, काँग्रेसचे, डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे,  वंचित बहुजन आघाडीकडून  नरसिंग उदगीरकर, या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह काही अपक्ष  उमेदवारांनी हीे आपले नशीब आजमवले.
निवडणूक म्हटल्यावर कोणता उमेदवार ‘गरीब’ कोणता ‘श्रीमंत’ याची चर्चा तर होतेच पण शैक्षणिक वारसा लाभलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार अल्पशिक्षित, कोणता उच्य शिक्षित याचा ‘उहापोह’ ही मोठ्या प्रमाणावर झाला. भाजपाचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे हे उमेदवारांत अल्पशिक्षित दहावी पास उमेदवार होते. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या व राष्टीय पक्ष असलेल्या काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारात सरळ-सरळ लढत होत असलेल्या डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे व सुधाकर श्रृंगारे या उमेदवारांची ही शैक्षणिक अर्हता पाहता अल्पशिक्षित विरोधात अशीच लढत झाली.  देशाचे भवितव्य घडविणा-या या निवडणूकीत ‘हुशार’ लातूर लोकसभा मतदारसंधातील मतदारांनी उच्च शिक्षित उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना मोठ्या मताधिक्यांने पास करत त्या देशाचे उच्य सभागृह असलेल्या संसदेत पाठवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR