धाराशिव जिल्हयात राणा पाटील, तानाजी सावंतांचा करिष्मा कायम  ; शिवसेना चार, भाजपचे तीन नगराध्यक्ष विजयी

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबरला निवडणूक झाली होती. त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी मंत्री तानाजी सावंतांचा करिष्मा कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कळंब, भूम, परंडा, उमरगा या चार, ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले तर भाजपचे तुळजापूर, नळदुर्ग, मुरूम हे तीन ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले. तर धाराशिव नगरपालिका निवडणुकीत भाजप व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.

धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान पार पडले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत बिघाडी झाली होती. महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीमधील तीन मित्रपक्षांने एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केला होता. मात्र, महायुतीमध्ये बिघाडी झाली होती. परंडा, भूम येथे माजी मंत्री तानाजी सावंतांविरोधात भाजपसह सर्वपक्षांने टाईट फिल्डिंग लावली होती. तर धाराशिव जिल्ह्यातील आठही नगरपरिषदांच्या निवडणुकीत अटातटीची लढत पाहवयास मिळाली.

धाराशिव नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेस एकत्र आली होती. याठिकाणी ठाकरे सेनेच्या संगीता गुरव व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रविणा कुरेशी व भाजपच्या नेहा राहुल काकडे यांच्यात तिरंगी लढत झाली. मतमोजणीला उशिरा सुरुवात झाल्याने या ठिकाणी काही फेऱ्यांची मतमोजणी शिल्लक राहिली असून याठिकाणी राष्ट्रवादीच्या कुरेशी व भाजपच्या काकडेमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.

कळंब नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सुनंदा कापसे या विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. मीनाक्षी भवर तर ठाकरे यांच्या शिवसेनेच्या रश्मी मुंदडा यांचा पराभव केला. याठिकाणी महायुतीमध्ये फूट पडली पडली होती. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवली आहे.

तुळजापूरमध्ये भाजपचे विनोद (पिटू) गंगणे विजयी झाले त्यांनी महाविकास आघाडीच्या अमर मगर यांचा पराभव केला. नळदुर्ग नगरपालिकेत भाजपचे बसवराज धरणे हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अशोक जगदाळे व एमआयएमचे शहबाज काझी, राष्ट्र्वादी काँग्रेसच्या संजय बताले यांचा पराभव केला. नळदुर्ग नगरपालिकेत काँग्रेसचे 9 तर भाजपचे 10 व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला.

उमरगा नगरपालिकेसाठी महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे किरण गायकवाड यांनी बाजी मारली. या निवडणुकीत त्यांनी जवळपास सहा हजार मताने विजय मिळवला. त्यांनी भाजपचे हर्षवर्धन चालुक्य, ठाकरे सेनेचे रज्जाक अत्तार यांचा पराभव केला.

मुरूम नगरपालिका निवडणुकीत भाजपचे बापूराव पाटील विजयी झाले. त्यांनी याठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. तर परंडा नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार झाकीर सौदागर विजयी झाले त्यांनी त्यांच्या विरोधातील भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या आघडीचे उमेदवार विश्वजीत कदम यांचा पराभव केला. तर भूममध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेच्या संयोगिता गाढवे विजयी झाल्या. त्यांनी विरोधातील सर्वपक्षीय उमेदवार सत्त्वशीला थोरात यांचा पराभव केला.

एकंदरीतच या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीने मोठे यश मिळवले आहे. धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा करिष्मा कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे या निवडणुकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील व आमदार प्रवीण स्वामी यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news