Homeधाराशिवधाराशिव जिल्ह्यात नद्यांना महापूर, अनेक गावचा संपर्क तुटला

धाराशिव जिल्ह्यात नद्यांना महापूर, अनेक गावचा संपर्क तुटला

सिना कोळेगाव धरणातून ८० हजार १५० इतका विसर्ग सुरु मांजरा, तेरणा नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पुलावरुन पाणी

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२६) रात्रीपासून पावसाचा वेग प्रचंड वाढला आहे. तो शनिवारी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प, नद्या, नाले, ओढे यांना महापूर आला आहे. तसेच या नदी नाले, ओढ्यावरील पुलावरुन पाणी ओसंडून वाहत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या गावचे संपर्क तुटले आहेत. तर १ हजार लोकांना प्रशासनाकडून सुरक्षीत ठिकाणी हलविले आहे. पिकांच्या नुकसानीबरोबर घरांचे, शेतीची खरडून जावून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील सर्वाधिक एकमेव मोठा असलेला सिना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शुक्रवार व शनिवारी मोठ्या प्रमणात पाउस झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प तुडूंब भरला आहे. या धरणातून शनिवारी (दि.२७) सायंकाळी ५ वाजता ८० हजार १५० इतका विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे सिना नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकरी, नागरिक या सर्वांनी सतर्कतता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय जिल्ह्यातील तेरणा प्रकल्पासह विविध १७ मध्यम प्रकल्पातील बहुतांश प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून अनेक तलाव भरुन ओसंडून वाहत आहे. तेरणा प्रकल्प भरल्यामुळे तेरणा नदीही ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नदीवरील पुलावरुन पाणी वाहत आहे. पुलावरुन पाणी जात असल्याने अनेक ठिकाणी गावचा संपर्क तुटला असून १२७ लघु प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. यातील अनेक प्रकल्पातील पाणी ओसंडून वाहत असून त्या भागातील नदी, नाले, ओढे याठिकाणच्या पुलावरुन पाणी जावून गावचा संपर्क तुटला आहे.

तुळजापूर तालुक्यातील शहापूर गावचा संपर्क पुलावरील पाण्यामुळे तुटला होता. पाणी कमी झाल्यामुळे साधारणत: दोन ते तीन तासानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. दैठणा गावात रात्रीचा पावसामुळे दोन जनावरे वाहून गेली असून एक जनावर वीज पडून मयत झालेले आहे. दोन दिवशी अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे सर्व गावक-यांनी सुरक्षित रहावे. कसलीही अडचण असल्यास तात्काळ प्रशानाशी संपर्क करावा अशा सूचना अपर जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
पांढरेवाडी (ईट) ता. भूम येथे संगमेश्वर प्रकल्पाातील वाढत असलेला विसर्ग लक्षात घेता तसेच मांजरा नदीची पातळी वाढत असल्याने याठिकाणी नदी पात्रलगत वास्तव्यास असणा-या २० ते २५ कुटुंबांना सद्य स्थितीत असणारी धोक्याची शक्यता लक्षात घेता त्यांचे स्थलांतर करण्याची व्यवस्था प्रशासनामार्फता जिल्हा परिषद शाळा ईट येथे केली आहे.

प्रकल्पाशी संबंधित जलसंपदा विभागाचे अधिकारी यांचेशी चर्चा करून अधिक पाणी पातळी वाढल्यास तत्काळ माहिती देण्याची सूचना केलेली आहे. जेणेकरून पुढील आवश्यक त्या उपाय योजना करता येतील. प्रशासन गावातील ग्रामस्थ यांच्या संपर्कात असून योग्य पूरस्थितीच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

धाराशिव तालुक्यातील बेंबळी-बोरखेडा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. काजळा (ता.धाराशवि) येथील पुलावरुन पाणी जात असल्याने वाहतूक बंद झाली आहे. कळंब तालुक्यातील गोविंदपूर-खामसवाडी रस्ता बंद झालेला आहे. आढळा गावातील मांजरा नदीकिणारी धोकादायक नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. परंडा तालुक्यातील जवळपास एक हजार लोकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR