गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड आणि छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथक सी ६० दलातील एक जवान शहीद झाला. आज मंगळवारी दिरंगी-फुलणार जंगल परिसरात ही चकमक झाली. महेश नागुलवार (३९, रा. अनखोडा) असे शहीद जवानाचे नाव आहे.
छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलणार येथील जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी तळ ठोकला होता. याची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी सी ६० चे १८ पथक आणि सीआरपीएफच्या दोन पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी मोहीम राबवली. आज या परिसराला घेराव घातल्यानंतर झालेल्या चकमकीत गडचिरोली सी ६० पथकाचा जवान महेश नागुलवार शहीद झाला.