17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरनटवर्य श्रीराम गोजमगुुंडे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 

नटवर्य श्रीराम गोजमगुुंडे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 

लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, जिल्हा शाखा लातूर व दयानंद कला महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग लातूरद्वारा दि. १ ते ४ डिसेंबरदरम्यान नटवर्य श्रीराम गोजमगुंडे स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत एकुण २९ एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. ही स्पर्धा नाट्यरसिकांना मेजवाणी ठरणार आहे.
दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात होणा-या या एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे. स्पर्धेतील पहिली एकांकिका सोहम थिएटर हैदराबाद या संस्थेची प्रेम-अ-भंग ही धनंजय कुलकर्णी लिखीत व सुहास बर्वे दिग्दर्शीत एकांकिका सादर होणार आहे. त्यानंतर कथाकार नाट्यमंडळी पुणेतर्फे निरज रानडे लिखीत शार्दुल राजापुरे व संदेश कांबळे दिग्दर्शित पेन सलामत ही एकांकिका सादर होणार आहे. दुपारी ३ वाजता राशोर एन्टरटेन्मेट पुणे या संस्थेची सतिश आळेकर लिखीत व राहूल देवकते दिग्दर्शित सुपारी ही एकांकिका सादर होईल. दुपारी ४.१० वाजता युगांक सांस्कृतिक व क्रीडा मंडळ परंडातर्फे योगेश सोमण लिखीत प्रा. संभाजी धनवे दिग्दर्शित दृष्टी, सायंकाळी ५.२० वाजता द ड्रामाटाईसर, छत्रपती संभाजीनगरद्वारा करणसिंह ठाकुर लिखीत वर्गणी ही एकांकिका सादर होणार आहे.
दि. २ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता लक्ष्मीमामा फाऊंडेशन लातूरद्वारा पांडूरंग वाघमारे लिखीत व दिग्दर्शित आंबेडकरीझम, सकाळी ११ वाजता दयानंद कला महाविद्यालय लातूरची ऋषिकेश तुराई लिखीत व विजय मस्के दिग्दर्शित कॅलिडोस्कोप, दुपारी १२.२० वाजता श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी यांची सतिश व्हांडे लिखीत व दिग्दर्शित राम मोहंमदसिंग आझाद, दुपारी २ वाजता नाट्यमय पुणे यांची अनिकेत बोले लिखीत व शारदा बवरे दिग्दर्शित डोन्ट क्विट, दुपारी ३.१० वाजता नाट्यारंभ हवेली,पुणेतर्फे डॉ. निलेश माने लिखीत व सुरज इप्ते दिग्दर्शित शोशित, दुपारी ४.२० वाजता आरआयपी इस्लामपूर, सांगलीद्वारा अभिषेक लिखीत व पवार दिग्दर्शित व्हाय नॉट?, सायंकाळी ५.३० वाजता मानवता बहुउद्देशिय संस्था लातूरद्वारा पुजा सोनवणे लिखीत व रणजित आचार्य दिग्दर्शित घुंगरु, सायंकाळी ६ वाजता श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा ता. परळीतर्फे फिरोज काझी लिखीत व डॉ. तुकाराम देवकर दिग्दर्शित सन्माननिय षंढांनो ही एकांकिका सादर होणार आहे.
दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नाट्यदर्शन छत्रपती संभाजीनगरतर्फे गोपाळ वाघमारे लिखीत व दिग्दर्शित विधुर, सकाळी ११.१० वाजता नाट्य गंधर्व डोंबिवली, मुंबईद्वारा मयुरेश पंडित लिखीत व दिग्दर्शित दिन तैसी रजनी, दुपारी १२.२० वाजता रंज फौज, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने संदीप पाटील लिखीत व बाळु बटुके दिग्दर्शित द लास्त बॅटल, दुपारी २ वाजता स्नेहांकीत, छत्रपती संभाजीनगरद्वारा धनंजय सरदेशपांडे लिखीत व शैलेश देशमुख दिग्दर्शित मृत्योर्मा, दुपारी ३.१० वाजता एम्पारिकल, मुंबईद्वारा सुदर्शन पाटील लिखीत व दिग्दर्शित सर्पसत्र, दुपारी ४.२० वाजता कलाकार कट्टा भूसावळतर्फे दीपक शिंदे लिखीत मोहिनी जोशी दिग्दर्शित मै हूॅ ना!, सायंकाळी ५.३० वाजता जिराफ थिएटर, कल्याणच्या वतीने राकेश जाधव लिखीत व अनिल/राकेश दिग्दर्शित गुड बाय कींस, सायंकाळी ६.४० वाजता मॉडर्न कॉलेज पुणेद्वारा शिरिष कुलकर्णी लिखीत व राज पाटील दिग्दर्शित द सिक्रेट ऑफ लाईफ, सायंकाळी ७ वाजता रसाभिनय पाथर्डी अहमदनगर यांच्या वतीने पवन पोटे लिखीत व शुभम घोडके, ऋषिकेश सकटे दिग्दर्शित देखावा ही एकांकिका सादर होणार आहे.
दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता कलासक्त अंधेरी, मुंबईद्वारा इरफान मुजावर लिखीत व योगेश कदम दिग्दर्शित पूर्णविराम, सकाळी १०.१० वाजता अंबेश्वर थेटर ठाणे अंबरनाथद्वारा यामीनी मेस्त्री, ऋषिकेश कटके लिखीत चारु, सकाळी ११.२० वाजता कला फॅक्टरी अंधेरी मुंबईद्वारा चेतन टेबूरकर लिखीत व योगेश कदम दिग्दर्शित मंडेला इफेक्ट, दूपारी १ वाजता तोडक मोडक मुंबईतर्फे शिवराम गावडे लिखीत  व दिग्दर्शित सत्यमेव जयते, दुपारी २.१० वाजता क्रिएटिव्ह कार्टी मुंबईच्या वतीने चैतन्य सरदेशपांडे लिखीत व योगेश कदम दिग्दर्शित इंंट्रोगेशन, दुपारी ३.२० वाजता नाट्यवारी मुंबईच्या वतीने शिवराम गावडे लिखीत व दिग्दर्शित न्युरालिंक तर सांयकाळी ४.३० वाजता काऊड नाट्यसंथा डोंबीवली मुंबईच्या वतीने प्राजक्त देशमुख लिखीत व संकेत पाटील दिग्दर्शित चिनाब से रावी तक ही एकांकिका सादर होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता
पारितोषीक वितरण होणार आहे. या एकांकिका स्पर्धेदरम्यान दि. १ डिसेंबर रोजी रात्री ७.३० वाजता रसबहार लातूर निर्मित पुन्हा: पुन्हा मोहोंजोंदारो या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR