नवाजुद्दीन सिद्दीकीनंतर आता आलिया भट्टची ‘तुंबाड २’मध्ये एन्ट्री

मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर आणि कल्ट क्लासिक हॉरर-थ्रिलर चित्रपट ‘तुंबाड’च्या दुस-या भागात मोठी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या दुस-या भागात प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्टची एन्ट्री झाली आहे. तुंबाडचे निर्माते सोहम शाह यांनी याबाबत घोषणा केली आहे. आलिया सिनेमात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

सोहम शहा यांनी आलियासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिचे त्याच्या टीममध्ये स्वागत केले आहे. या फोटोत आलियाच्या हातात ‘तुंबाड’मधली पिठाची बाहुली दिसत आहे. मात्र यात आलियाची भूमिका नक्की काय असेल यावर मात्र मौन बाळगण्यात आले आहे.

‘तुंबाड २’ या चित्रपटातील काही भाग हा मुंबईत शूटिंग करण्यात येणार असून, याकरता मुंबईत एका शहरासारखा दिसणारा ७-८ एकरांचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. ‘तुंबाड २’ चे दिग्दर्शन आदेश प्रसाद यांनी केले असून, अभिनेता-निर्माता सोहम शाह यांनी त्यांच्या ‘सोहम शाह फिल्म्स’ या बॅनरखाली निर्मिती केली आहे. हा चित्रपट ३ डिसेंबर २०२७ ला प्रदर्शित होणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51

Latest news