नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात, ८ ठार

५ जण गंभीर, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
भोकर : प्रतिनिधी
भोकरहून नांदेडला जाणा-या भरधाव ट्रकने टाटा मॅजिकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भोकरपासून जवळच नांदेड-भोकर महामार्गावरील वाकद गावाजवळ सीताखंडीनजीक गुरुवारी सायंकाळी ७ वाजता अपघात झाला. जखमींना तातडीने नांदेड आणि भोकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मॅजिक वाहन (क्र. एमएच २६ ए. के. ०५४८ हे नांदेडहून भोकरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी ट्रक (क्र. ए. पी. २९ पी. ए. ८१२९) भोकरकडून नांदेडकडे येत होता. सीताखंडी परिसरात दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, मॅजिक ऑटोचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. मॅजिक ऑटोत चालकासह एकूण १५ च्या वर प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या अपघातात सय्यद अलमास (रा. बिलालनगर, भोकर), शेख फिरोज (रा. भोकर), पांडुरंग लिंगू वाघमारे (मिस्त्री) आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई पांडुरंग वाघमारे (रा. सय्यदनगर, भोकर), बलवान पवार (रा. पोटातांडा, ता. हदगाव) आणि एक अनोळखी व्यक्ती अशा ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. यासोबतच आणखी दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

भोकरपासून काही अंतरावर असलेल्या सीताखंडी घाटाजवळ हे वाहन आले असता समोरून येणा-या मालवाहू ट्रकशी त्याची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यामुळे मॅजिक वाहन रस्त्याच्या बाजूला फेकला गेले.​ त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, अपघातात ट्रकचालकही ट्रकमध्ये अडकून पडल्याची माहिती असून त्याला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू होते. सायंकाळच्या वेळेत घडलेल्या या भीषण अपघातामुळे नांदेड-भोकर मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Illegal Moneylending Case | अवैध सावकारीविरोधात गुन्हा दाखल | Latur News | Ekmat Digital
01:52
Video thumbnail
Latur Railway Coach Factory | स्थानिक युवकांना रोजगार कधी? | Latur News | Ekmat Digital
03:12
Video thumbnail
माहूरजवळ भीषण अपघात | एकाचा मृत्यू, चार गंभीर जखमी | Nanded News Today
02:03
Video thumbnail
Latur|समान वेतनासाठी सेवानिवृत्त कर्मचारी आक्रम;कवेतनातील तफावत कधी मिटणार?
06:30
Video thumbnail
Nanded Sand Mafia Action | आठ बोटी ब्लास्ट करून नष्ट | LCB Raid | Nanded News
00:48
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये १४.४८ लाखांचा गुटखा जप्त | बोलेरोसह मुद्देमाल ताब्यात | Latur News
01:42
Video thumbnail
'गोविंदा' अन् 'उदो उदो'च्या जयघोषात अंबाबाईला तिरुपती देवस्थानचा मानाचा शालू अर्पण
00:56
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
47:58
Video thumbnail
Latur Traffic Police|आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेचे सुरक्षा कवच!
02:17
Video thumbnail
५ हजार मदत म्हणजे क्रूर थट्टा; दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनांची मागणी.
10:59
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
02:49
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37
Video thumbnail
Nanded|माहूरच्या केरोळी घाटात भीषण अपघात! टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर
01:10

Latest news