26.6 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकमधून हेमंत गोडसे पराभवाच्या छायेत

नाशिकमधून हेमंत गोडसे पराभवाच्या छायेत

राजाभाऊ वाजे तब्बल ९४ हजार मतांनी आघाडीवर

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासात देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी दहाव्या फेरीअंती तब्बल ९४ हजार ७३५ मतांची आघाडी घेतली आहे. तर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे पराभवाच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत होत आहे. राजाभाऊ वाजे यांना पहिल्या फेरी अखेरीस १०७५२ मतांची आघाडी घेतली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR