23.9 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeलातूरनिलंगा तालुक्यातील हजारो आंदोलक जरांगेंच्या दिंडीत

निलंगा तालुक्यातील हजारो आंदोलक जरांगेंच्या दिंडीत

निलंगा :  प्रतिनिधी
मराठा समाजाच्या सुरू असलेल्या आरक्षण लढ्यात मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यात सहभागी होण्यासाठी घोषणाबाजी करीत निलंगा तालुक्यातील साधारणत: १०० वाहनांच्या ताफ्यातून दोन हजार आंदोलक थेट मनोज जरांगे पाटील यांच्या पायींिदडीत सहभागी झाले आहेत. तर टप्प्याटप्प्याने निलंगा तालुक्यातून दहा हजार आंदोलक सहभागी होणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले .
       मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी म्हणून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरपारची लढाई उभारली असून दि २६ जानेवारी रोजी मुंबई येथे उपोषणाला बसण्यासाठी दि २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी ते मुंबई पायींिदडी निघाली असून मराठा आरक्षण लढ्याचे केंद्रंिबदू झालेल्या निलंगा तालुक्यातून पायींिदडीत सहभागी होण्यासाठी मोठी तयारी केली गेली. मागच्या ४३ वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळविण्याचा हा निर्णायक टप्पा असून ‘अभी नही तो कभी नही’ अशी जनजागृती करुन मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन निलंगा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या आवाहनाला मराठा बांधवांनी भरभरुन प्रतिसाद देत प्रत्येक गावातून किमान दोन वाहने काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पायींिदडीत गैरसोय होऊ नये म्हणून दररोज १० हजार आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. जेवणाची व्यवस्था करणारी टिम दोन ट्रक मधून दि १९ जानेवारी रोजीच अंतरवली सराटी येथे पाठविण्यात आली होती. दि २० जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या ठिकाणी ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणाचा गजर करण्यात आला. तर वाहनांतून निघताना आता  आरक्षण घेतल्याशिवाय मागे परतणार नाही.   आता कस, मनोज जरांगे पाटील म्हणतील तस, अशा घोषणा देत साधारणत: २ हजार आंदोलक सकाळी दहा वाजता अंतरवली सराटी येथून मुंबईला निघालेल्या पायींिदडीत सहभागी झाले. विशेषत: पहिल्या दिवसापासून पायींिदडीत महिलांनीही मोठा सहभाग घेतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR