23.7 C
Latur
Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रनिलेश लंकेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट

निलेश लंकेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट

जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनानंतर १ महिन्यासाठी आपले उपोषण स्थगित केले आहे. मात्र उपोषण काळात प्रकृती बिघडल्याने मागील काही दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.

त्यामुळे जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी राजकीय नेत्यांची रीघ लागली असून मराठवाड्यातील खासदारांनी त्यांची भेट घेतल्यानंतर आता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR