किल्लारी : वार्ताहर
तेरणा नदीच्या काठा जवळ आसलेल्या येथील स्वम्भू निळकंठेश्वर मंदिरात पहाटेपासून महिला पुरुषाच्या अभिषेक करण्यासाठी व दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. परीसरातील औसा, उमरगा, निलगा लोहारा तालुक्यातील गावातील भाविकानी हजारोच्या संखेने गर्र्दी केली होती. रात्री बारा वाजल्यापासून अभिषेक सुरू होते , तम्मा स्वामी, नारायण कुलकर्णी यानी अभिषेक केले
तर गुरुवर्य पंडीत मिश्रा यांच्या शिवपुराण कथेमुळे व फेसबुक सोसल मिडीयातील प्रचारामुळे निलकंठेश्वरच्या भाविकांच्या संखेत वाढ झाली असून एक लोटा जलसाठी महिलांची शिवलींगाची पूजा करण्यासाठी गर्दी केली. मंदिरात पूजा करण्यासाठी तीन तास थांबावे लागत आहे. निळकंठेश्वर मंदीर कमेटीने व गुरव समाजाने पुरुष महिलाच्या रांगा लावून दर्शनाची चांगली व्यवस्था केली आहे मंदिरातील स्वच्छता, सजावट गुरव समाजाने चांगली केली आहे. या सजावटीसाठी मधुकर पुजारी, निळकंठ पुजारी,आनिल पुजारी आकाश पुजारी, धिरज पुजारी, सÞतोष पुजारी, रमेश पुजारी यानिमिताने फुले बेल नारळ पेढे यांचे स्टॉल लागले आहेत
परीसरातील अधिकारी, कर्मचारी विविध पक्षाचे नेते , सर्व पक्षाचे पदाधिकारी तसेच किल्लारी, यळवट, सिरसल, चिंचोली, लामजना, मोगरगा, उत्तका, दावतपूर, तळणी, बाणेगाव, मंगरूळ, सारणी कवठा, एकोडी, मातोळा, नारंगरवाडी, सावळसूर, नदी हातरगा, सांगावी, जेवरी, ननंद, कारला, कुमठा, सिंगनाळ, एकोजी मुदगड, सरवडी, मदनसूरी आदी गावातील भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. पहाटे चार वाजल्यापासून अभिषेक सुरू होते १२ वाजेपर्यंत ३०० अभीषेक झाल्याची माहीती मिळाली अभिषकासाठी ३० रुपयांची पावती ठेवण्यात आली आहे
श्री निळकंठेश्वर यात्रामहोत्सवास दि. १० ऑगस्ट २०२५ पासून होणार असल्यामुळे मंदिर कमिटीने दर्शन रंगाची व्यवस्था दोन दालने निर्माण करून भाविकला त्रास होऊ नये याची दक्षता घेत आहेत. या निमित्ताने यात्रेची तयारी यात्रेची पूर्वतयारी जोरात सुरू आहे यात्रेमध्ये गैरप्रकार होऊ नये म्हणून सीसी टरव्ही कॅमेरे बसहवण्यात आलक आहे तसेच पार्किंग व्यवस्था, महिला पुरुषाची रांगेची व्यवस्था व वृद्धांना अपंगांना जलद गतीने दर्शनाची सोय करण्यात आली आहे असे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अशोक गावकरे, चंद्रकांत बाबळसुरे, मनोहर गवारे, नामदेव माळवदे, प्रकाश पाटील निळकंठ, बिराजदार यांनी माहिती दिली.