21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरनिवडणूक पोलीस निरीक्षक यांनी केली मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची पाहणी

निवडणूक पोलीस निरीक्षक यांनी केली मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची पाहणी

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने शशांक जायस्वाल यांची नियुक्त्ती केली असून त्यांनी शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे तयार करण्यात आलेल्या मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची पाहणी केली. तसेच संबंधितांना येथील उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, तहसीलदार सौदागर तांदळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मतदान यंत्र सुरक्षा कक्ष, मतमोजणी कक्ष आणि परिसराची श्री. जायस्वाल यांनी यावेळी पाहणी केली. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेवून त्याबाबत सूचना दिल्या. सुरक्षा कक्ष लवकरात लवकर सज्ज करण्याबाबत कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या लखमापूर आणि बर्दापूर येथील स्थिर निगराणी पथकांना निवडणूक पोलीस निरीक्षक शशांक जायस्वाल यांनी भेट देवून तेथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी रेणापूरच्या तहसीलदार मंजुषा भगत उपस्थित होत्या. स्थिर निगराणी पथकातील अधिकारी, कर्मचा-यांनी यावेळी कामकाजाची माहिती दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR