24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूरनीट पेपरफु टी प्रकरणात दिल्लीचा गंगाधर ‘शक्तीमान’!

नीट पेपरफु टी प्रकरणात दिल्लीचा गंगाधर ‘शक्तीमान’!

लातूर : विनोद उगीले
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट पेपरफु टी प्रकरणाचे धागेदोरे लातूर पर्यंत पोहचल्याने लातूरचे नाव पुन्हा एकदा देशभरात चर्चेला आले आहे. नीट पेपरफु टी प्रकरणात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिट यांचेकडून पेपरफु टीच्या नवीन कायद्यानुसार ४ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दिल्लीचा संशयीत आरोपी गंगाधर हाच शक्तीमान असल्याचे तर त्याला लातूरातील दोन जिल्हा परिषद शिक्षक व धाराशिव जिल्ह्यातील एक आयटीआय शिक्षक याकामी त्याला मदत करीत असल्याचे पोलीस तपासातून समोर येत आहे.
    दिल्लीच्या संसदे समोर लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे नामक तरूणाने धुळकांडी फोडल्याने लातूरचे नाव देशभरात चर्चेला आले होते. याला काही महिने उलटले नाही तोवरच बहुचर्चित नीट   पेपरफु टी प्रकरणात लातूरात गुन्हे दाखल झाल्याने लातूर पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आले आहे. लातूरात शनिवारी दाखल झालेल्या दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिटने शनिवारी लातूरातील संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ उमरखान पठाण या दोन शिक्षकांना ताब्यात घेऊन त्यांची या प्रकरधी चौकशी करून सोडून दिले होते. मात्र रविवारी रात्री उशिरा याच लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिट यांचेकडून पेपरफु टीच्या नवीन कायद्यानुसार या दोन शिक्षकासह धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआय शिक्षक ईरन्ना मष्णाजी कोनगलवार मुळ रा. देगलूर, जि. नांदेड व दिल्ली येथील गंगाधर नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केल्याने या पेपरफु टी प्रकरणात लातूरशी धागेदोरे जाडली गेल्याचे समोर आले.
या चार संशयीत आरोपींमध्ये आरोपी संजय तुकाराम जाधव, जलीलखॉ उमरखान पठाण या शिक्षकांकडे नीटच्या काही विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सापडले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, हे शिक्षक व उमरगा येथील आयटीआय शिक्षक विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना परीक्षेपूर्वीच पेपरची माहिती देत होते. या तीन्ही आरोपींचा संपर्क दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीसोबत असल्याचं समोर आले आहे. म्हणजेच, नीट परीक्षेच्या पेपर्सच्या व्यवहारात दिल्लीतील गंगाधर हाच ‘शक्तीमान’ असून या व्यक्तीचा मोठा हात असल्याची माहिती समोर येत आहे. या गुन्ह्यातील तीन्ही शिक्षक हे काही रक्कम स्वत:कडे ठेवून घेऊन ठरलेली रक्कम दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीला पाठवत होते.
त्यांच्या बँकेत खात्यातून मोठ्या प्रमाणातली आर्थिक उलाढाल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शिक्षकांच्या मोबाईलमध्ये प्रवेशपत्र असलेले विद्यार्थी कोण? संजय जाधव आणि उमरखान पठाण यांच्या मोबाईलमध्ये आढळून आलेल्या प्रवेश पत्राच्या आधारे पोलीस आता त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही विद्यार्थी आणि त्यांची पालकांची चौकशीही सुरू असल्याची माहिती आहे. आर्थिक व्यवहार किती रुपयांत ठरला होता. पैसे कशा पद्धतीनं पोहोचती केले? त्या विद्यार्थ्यांपर्यंत यांनी कोणत्या माध्यमातून संपर्क साधला? याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याचे समजते.
चौकशीत एटीएसला अशी झाली खात्री
शनिवारी लातूरात दाखल झालेल्या दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिटने लातूरातील संजय तुकाराम जाधव, जलीलखॉ उमरखान पठाण यांच्या कसून केल्या चौकशीत दिनांक ०१ जानेवारी २०२३ ते दि. २२ जून २०२४ रोजीचे दरम्यान लातूर येथे नमुद आरोपीतांचे घरी तसेच वेगवेगळ्या ठिकाणी इसम नामे (१) संजय तुकाराम जाधव, वय ४० वर्षे, ने. शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टाकळी, ता. माढा, जि. सोलापूर मुळगाव बोथी तांडा, ता. चाकुर, जि. लातुर ह.मु. व्दारा सुधाकर रायनाळे, जिजाऊ कॉलनी, रेणापूर रोड, लातूर मो.नं. ९४२३२६३३२५, ७६६६८५६२८२, (२) जलीलखॉ उमरखान पठाण, वय ३४ वर्षे, ने. मुख्याद्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कातपुर, ता. जि. लातूर ह. मु. अल हयात अपार्टमेंट, टाकेनगर मस्जिदजवळ, लातूर मो.नं. ७०६६१०१०७४, ९४२१३०१०९१, (३) इरन्ना मष्णाजी कोनगलवार ने. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरगा जि. धाराशिव मो.नं. ९८३४८४११५० आणि (४) गंगाधर (पुर्ण नाव माहित नाही), रा. दिल्ली मो.नं. ९९११३३०१६५ हे एकत्र येवून गैरमार्गाचा अवलंब करून विविध सार्वजनिक परीक्षा मंडळामार्फत घेतल्या जाणा-या परीक्षेतील उमेदवारांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या पैशाचे मोबादल्यात अवैध मदत करण्याचा गैरप्रकार करीत आहेत. अशी खात्री झाली व त्यांनतर गुन्हा दाखल केला.
अन संजय जाधव याने मान्य केले
शनिवारी एटीएसच्या चौकशी दरम्यान संजय तुकाराम जाधव, जलीलखॉ उमरखान पठाण यांच्या मोबाईल गॅलरी व ईमेल माहितीची खातरजमा केली असता त्यात अनेक भिन्नभिन्न परिक्षार्थींचे परीक्षा प्रवेशपत्राच्या प्रती व परिक्षार्थींचे वहाटसप चॅटींग दिसून आले. ज्यांचे बद्दल ते समाधानकारक खुलासे करू शकले नाहीत. तसेच संशयीत जलीलखॉ उमरखान पठाण याने संशयीत संजय तुकाराम जाधव यास काही प्रवेशपत्राच्या प्रती व अर्थिक व्यवहारासंबधी लघूसंदेश पाठवल्याचे दिसून आले. सदर प्रकरणी संशय वाढल्याने आणखीन विचारणा केली असता संजय जाधव याने पैशाच्या मोबदल्यात परिक्षा पास करण्याचे अभिवचन देवून अनेक विद्यार्थ्यांची प्रवेश पत्र आयटिआय संशयीत शिक्षक ईरन्ना कोनगलवार यास व्हाटसपवर पाठवल्याचे मान्य केले. तसेच त्याचे माहीतीनुसार ईरन्ना कोनगलवार हा दिल्लीच्या संशयीत गंगाधर नामक व्यक्तीला तो संबधित कागदपत्रे पाठवत असल्याचे ही समोर आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR