22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeअंतरराष्ट्रीयनेपाळचे पंतप्रधान दहल यांचा राजीनामा

नेपाळचे पंतप्रधान दहल यांचा राजीनामा

विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात अपयश
काठमांडू : वृत्तसंस्था
नेपाळमध्ये पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ ​​प्रचंड यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काठमांडू पोस्टनुसार ते संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात अपयशी ठरले. फ्लोअर टेस्टमध्ये त्यांना २७५ पैकी केवळ ६३ खासदारांचा पाठिंबा मिळाला. नेपाळच्या नॅशनल असेंब्लीच्या १३८ खासदारांनी त्याच्या विरोधात मतदान केले.

या महिन्याच्या सुरुवातीला नेपाळचा दुसरा सर्वात मोठा आणि केपी शर्मा ओली यांचा चीन समर्थक पक्ष सीपीएन-यूएमएलने पंतप्रधान प्रचंड यांचा पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळशी युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांना नेपाळच्या राज्यघटनेच्या कलम १०० (२) अंतर्गत बहुमत सिद्ध करावे लागले. त्यात ते आज अपयशी ठरले. ओली यांच्या पक्ष सीपीएन-यूएमएलने देशातील सर्वात मोठा पक्ष नेपाळी काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या ४ महिन्यांपूर्वी केपी शर्मा ओली यांनी प्रचंड यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. मग प्रचंड यांनी शेर बहादूर देउबा यांच्या नेपाळी काँग्रेससोबतची युती तोडली.

शेर बहादूर देउबा हे भारत समर्थक मानले जातात तर ओली चीनच्या जवळचे मानले जातात. रविवारी मध्यरात्री देउबा आणि ओली यांच्यात पंतप्रधानपदाबाबत चर्चा झाली. विश्वास प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आवश्यक १३८ मते मिळवण्यात प्रचंड अपयशी ठरले. कारण २७५ सदस्यांच्या प्रतिनिधीगृहात केवळ ६३ खासदारांनी त्याच्या बाजूने मतदान केले.

ओली होऊ शकतात पंतप्रधान
ओली यांच्या पक्ष सीपीएन-यूएमएलने देशातील सर्वात मोठा पक्ष नेपाळी काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या ४ महिन्यांपूर्वी केपी शर्मा ओली यांनी प्रचंड यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. मग प्रचंड यांनी शेर बहादूर देउबा यांच्या नेपाळी काँग्रेससोबतची युती तोडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR