30 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeअंतरराष्ट्रीयनेपाळमध्ये पूर,भूस्खलन; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी

नेपाळमध्ये पूर,भूस्खलन; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी

काठमांडू : वृत्तसंस्था
पावसामुळे नेपाळमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे मृतांचा आकडा २१७ च्या वर गेला आहे, तर २८ लोक बेपत्ता आहेत. गुरुवारपासून सुरू झालेल्या या आपत्तीने रविवारपर्यंत अनेक भागात मोठा विध्वंस सुरू ठेवल्याने हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. शुक्रवारपासून पूर्व आणि मध्य नेपाळचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे.

रविवारपासून काठमांडूतील हवामानात थोडी सुधारणा झाली असून त्यामुळे आपत्तीग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काठमांडू आणि नेपाळच्या इतर भागात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या मंगळवारी सकाळपर्यंत २१७ वर पोहोचली आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, गृह मंत्रालयाचे प्रवक्ते ऋषिराम तिवारी यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्तीशी संबंधित घटनांमुळे आतापर्यंत २८ लोक बेपत्ता आहेत आणि १४३ लोक जखमी झाले आहेत.

पावसामुळे आलेल्या आपत्तीमुळे काठमांडू खो-यात सर्वाधिक नुकसान झाले असून, तेथे मृतांचा आकडा ५० हून अधिक झाला आहे. नेपाळ आर्मी, सशस्त्र पोलिस दल आणि नेपाळ पोलिसांसह २० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी शोध, बचाव आणि मदत सामग्रीच्या वितरणासाठी तैनात करण्यात आले आहेत. ऋषीराम तिवारी यांनी सांगितले की, जखमींवर अनेक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या लोकांना तात्काळ मदत साहित्य पुरविण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR