Homeक्रीडापंजाबचे लखनौला २५५ धावांचे लक्ष्य

पंजाबचे लखनौला २५५ धावांचे लक्ष्य

मोहाली : आयपीएलच्या २९ व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपरजायंट्ससमोर २५५ धावांचे लक्ष्य ठेवले. न्यू चंदीगड येथे एलएसजीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने ७ गडी गमावून २५४ धावा केल्या. ही या हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी बंगळूरने चेन्नईविरुद्ध २५० धावा केल्या होत्या.

पंजाबकडून प्रियांश आर्याने ९३ धावा आणि कूपर कॉनॉलीने ८७ धावा केल्या. या दोघांनी दुस-या विकेटसाठी १८२ धावांची भागीदारी केली. त्यांनी मिळून १६ षटकार आणि १२ चौकार मारले. आयपीएलमध्ये पंजाब किंग्ससाठी १५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी होण्याची ही तिसरी वेळ होती. लखनौकडून प्रिन्स यादव आणि एम सिद्धार्थ यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR