HomeUncategorizedपंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

नैसर्गिक, पेट्रोलियम गॅससंदर्भात केली चर्चा
मुंबई : वृत्तसंस्था
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेला इंधन तुटवडा, गॅस पुरवठा आणि इतर महत्त्वाच्या बाबींसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्­यांसमवेत ऑनलाईन बैठक घेतली. युद्धजन्य परिस्थितीवर मोदींनी गेल्याच आठवड्यात संसदेत बोलताना चिंता व्यक्त केली होती. आज त्यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅससंदर्भात महत्त्वाची चर्चा केल्याचे समजते. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १५ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र शासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि १५ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने भूमिका मांडली. या कठीण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे नेतृत्व प्रदान केले, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. आज अनेक देशांमध्ये विविध बंधने आहेत. कुठे वर्क फ्रॉम होम, कुठे वाहनांवर निर्बंध, कुठे कामाचे दिवस/तास कमी. कुठे आपत्कालीन स्थिती जाहीर, पण भारतात सामान्य परिस्थिती आहे. आजच एक्साइज शुल्कात केलेली कपात, ही सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बाब आहे. राष्ट्र प्रथम आणि भारतीय प्रथम या तत्त्वाचा मोठा लाभ झाल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR