23.7 C
Latur
Tuesday, June 3, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरपतीने पत्नीची हत्या करून हार्ट अ‍ॅटॅकचा बनाव रचला

पतीने पत्नीची हत्या करून हार्ट अ‍ॅटॅकचा बनाव रचला

नागपूर : प्रतिनिधी
नागपूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या परिसरातील भीमनगर येथे राहणा-या दाम्पत्यातील घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले असून घटनेत सुरुवातीला हा खून नसून हृदयविकाराचा धक्का असल्याचे पतीने भासवले मात्र महिलेच्या कुटुंबीयांना तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसल्या. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले असता तिथे पोस्टमॉर्टेममध्ये या हत्येची सत्यता समोर आली आहे. शीतल जॉन्सन मंडपे (वय ३९ वर्षे) असे मृत पत्नीचे तर जॉन्सन मंडपे (४१) असे आरोपी पतीचे नाव आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, मंडपे दाम्पत्यात गेल्या सात वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे ते दोघे एकमेकांपासून वेगळे राहत होते. शिवाय शीतल आणि जॉन्सनला दोन लहान मुले देखील आहेत. दरम्यान शीतल आणि जॉन्सनमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि कालांतराने तो उफाळून आला.

त्यातच २२ मेच्या रात्री शीतल घरी एकटीच असताना सकाळच्या सुमारास जॉन्सनने शेजा-यांना सांगितले की, तिचा रात्रीच्या सुमारास अचानक हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू झाला. मात्र वादाची पार्श्वभूमी लक्षात घेता शीतलच्या नातेवाईकांना या मृत्यूवर संशय आला. त्यांनी घटनास्थळी पोहोचल्यावर पाहणी केली असता शीतलच्या शरीरावर ओरखडे, जखमा आणि गळा दाबल्याचे व्रण स्पष्टपणे दिसले, शिवाय चादरीवर रक्ताचे डागही आढळून आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR