26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रपवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही

पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही

मुंंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपाचे नेते अमित शहा हे सध्या महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. महाराष्ट्र दौ-यावर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांचा उल्लेख बाजारबुणगे असा केला असून, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रामधून कुणीच संपवू शकत नाहीत, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.

दरम्यान, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर अमित शहा हे आज नाशिक येथे पोहोचले आहेत. भाजपा आणि अमित शहा यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की, तुमच्यामध्ये सध्या भेसळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे.

तो भेसळीचा कार्यक्रम तुम्हाला मान्य आहे का? हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही थोतांड माजवलेलं आहे, हे हिंदुत्व माझे नाही. माझे हिंदुत्व वेगळे आहे. कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजारबुणगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला संपवण्याची भाषा करून गेले. आता ते भाषण मीपण ऐकलेले नाही. पण या बाजारबुणग्यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचा आहे. पण हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे. काल नागपूरला आलेला हा बाजारबुणगा उद्धव ठाकरेंना खतम करा, शरद पवार यांना खतम करा, असे म्हणाला. हिंमत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो हे दाखवून देतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

दिनेश परदेशी ठाकरे गटात
दरम्यान, भाजपाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरचिटणीस दिनेश परदेशी यांनी आज ‘मातोश्री’वर येत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी दिनेश परदेशी यांचं उद्धव ठाकरे यांनी पक्षात स्वागत केलं. परदेशी हे वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR