उदगीर : प्रतिनिधी
मागच्या दोन – तीन महिन्याच्या काळात आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली व त्यामुळे पशुधनासह शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्त शेतर्कयांना आधार मिळावा यासाठी रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल, श्री. नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, संघर्ष मित्रमंडळ व नारायणा अॅग्रो प्रा. लि. शेल्हाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने अतिवृष्टीमुळे पशुधन गमावलेल्या शेतक-यांना १६ गोधन वाटपाचा कार्यक्रम येथील गोरक्षण संस्था येथे करण्यात आला.
यावेळी माजी क्रीडा व युवक कल्याण बंदरेमंत्री आ संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत १६ कालवडी व गोरे वाटप करण्यात आले. यावेळी राहूल केंद्रे, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटिया, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विजय घोणसीकर, नायब तहसीलदार विलास सोनवणे, महादेव नौबदे, बालाजी भोसले, रामराव राठोड, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, प्रशांत मांगुळकर, मोतीलाल डोईजोडे, विक्रम हलकीकर, संतोष फुलारी, विशाल जैन, महानंदा सोनटक्के, सरस्वती चौधरी, राजकुमार पाटील , अनिरुद्ध गुरुडे, भास्कर पाटील, अभिजीत पुदाले आदी उपस्थित होते. यावेळी आ.संजय बनसोडे यांनी पुरपरिस्थितीत जनावरे वाहून गेली अशा शेतक-यांना याचा निश्चीत थोडासा आधार मिळणार आहे तसेच उदगीरची दुध डेअरी सुरू झाली पाहीजे. यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
या भागात दुध उत्पादनात वाढ होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहीजे म्हणून आपली दुध डेअरी एनडीडीबीकडे उदगीरच्या डेअरीचे हस्तांतरण लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहोत हा प्रकल्प एनडीडीबीकडे वर्ग होण्यासाठी केंद्र शासन सुध्दा सकारात्मक असून तीस टक्के राज्य शासन व सत्तर टक्के केंद्र शासनाने आपला वाटा उचलून ही डेअरी सुरु करण्यासाठी कटीबध्द असून लवकरच डेअरीचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे या भागातील पशुपालक शेतक-यांना याचा फायदा होईल असा विश्वासही आ.बनसोडे यांनी व्यक्त केला. विविध माध्यमातून शेतक-यांना मदत करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. असल्याचे आ.बनसोडे यांनी सांगीतले