नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम येथील अतिरेक्यांचा हल्ल्यात अमेरिकेचे हादरवणारे कनेक्शन आणि या मागे पाकिस्तानचे मोठे कारस्थान उघड झाले आहे. मात्र अमेरिकेशी तडजोड करण्याचा पाकिस्तानचा हेतू विफल झाला. अमेरिकन स्पेस कंपनी मॅक्सर टेक्नॉलॉजीज च्या डाटाने एक नवा खुलासा झाला आहे. काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याच्या दोन महिने आधीच अमेरिकन तंत्राचा वापर करुन हा हल्ला घडवण्याचे नियोजन झाल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे.
हल्ल्याच्या दोन महिन्यांपूर्वीच पहलगाम आणि आसपासच्या लष्करी ठाण्यांचे हाय-रिझोल्यूशन सॅटेलाईट्स इमेजची ऑर्डर अचानक दुप्पट झाली होती. २ ते २२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान २० दिवसात १२ ऑर्डर पहलगाम क्षेत्रातून आल्या होत्या असे होते अमेरिकन स्पेस टेक कंपनी मॅक्सर टेक्नोलॉजीजच्या डाटातून उघडकीस आले.
केवळ २० दिवसात १२ ऑर्डर पहलगाम क्षेत्रासाठी आल्या होत्या. ही संख्या सर्वसामान्य ऑर्डरच्या तुलनेत दुप्पट आहे. एवढेच नाही तर या इमेज ऑर्डरची सुरुवात जून २०२४ मध्येच झाली होती. त्याच वेळी जेव्हा मॅक्सरने पाकिस्तानची एक कुख्यात जिओ-स्पेशियल कंपनी ‘इ४२्रल्ली२२ र८२३ीे२ कल्ल३ी१ल्लं३्रङ्मल्लं’ ढ५३ छ३ ि(इरक)’ सोबत करार केला होता.
इरक चे मालक ओबैदुल्ला सैयद याला अमेरिकन कोर्टाने दोषी ठरवून जेलमध्ये पाठवले होते. त्याच्यावर अवैधरित्या हाय रिझोल्युशनचे कंप्युटर आणि सॉफ्टवेअर अमेरिकेतून पाकिस्तानच्या अ३ङ्मे्रू एल्ली१ॅ८ उङ्मे्र२२्रङ्मल्ल (ढअएउ) ला पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. अ३ङ्मे्रू एल्ली१ॅ८ उङ्मे्र२२्रङ्मल्ल कंपनी आण्विक अस्रे, क्षेपणास्रांचा विकास करते. हा निव्वळ योगायोग आहे की तिच कंपनी एका अमेरिकन सॅटेलाईट सेवा पुरवठादाराशी संधान साधून भारताच्या लष्करी ठाण्यांचे फोटो हस्तगत करत आहे?
पहलगाम, पुलवामा, अनंतनाग, राजौरी, पुंछ, बारामुल्ला या ठिकाणचे फोटो ‘बीएसआय’ने मागविले होते.
या सॅटेलाईट इमेजी किंमत तीन लाखांपासून सुरु होत आहे. दर्जानुसार त्याची किंमत कित्येक पटींनी वाढते. इस्रोच्या एका वरिष्ठ संशोधकाने सांगितले की हे स्पष्ट आहे की या सॅटेलाईट इमेजिंगचा वापर अतिरेक्यांनी प्लानिंगसाठी केलेला असू शकतो. भारत सरकारने मॅक्सर कंपनीची तातडीने चौकशी करायला हवी, लेफ्टनंट जनरल ए.के.भट्ट तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा सर्वात मोठा धोका आहे, असे म्हटले.