पाऊले चालती….

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार बुधवारी १२.३० वाजता) फ्रान्स आणि स्पेन या दोन युरोपियन खंडातील फुटबॉल महासत्तांमध्ये पहिला उपान्त्य सामना विलक्षण रंगला. आक्रमणावर भर देणारा फ्रान्स आणि भक्कम बचाव करणारा स्पेन यांच्यातील जुगलबंदीकडे सा-यांचे लक्ष लागले होते. यंदाच्या स्पर्धेत स्पेनने अवघा एक गोल खाल्ला आहे. यावरून त्यांचा भक्कम बचाव लक्षात येतो. एम्बाप्पे विरुद्ध उनाई सिमॉन, लॅमिन यमाल यांच्यातील द्वंद्व निर्णायक ठरणार होते. फिफा विश्वचषकाचा थरार गत महिनाभरापासून सुरू असून आता ही स्पर्धा उपान्त्य फेरीच्या टप्प्यावर आहे. फ्रान्स, मोरोक्को, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, अर्जेंटिना व स्वित्झर्लंड या आठ संघांनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.

त्यापैकी फ्रान्स, स्पेन, इंग्लंड व अर्जेंटिना या संघांनी आगेकूच केली, तर अन्य चार संघांची वाटचाल संपुष्टात आली. फ्रान्सने सलग तिस-यांदा विश्वचषकाची उपान्त्य फेरी गाठली आहे. १९९८ व २०१८ च्या विजेत्या फ्रान्सला २०२२ मध्ये अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. फ्रान्स हा सलग तीन विश्वचषकांत किमान उपान्त्य फेरी गाठणारा तिसरा देश ठरला. यापूर्वी ब्राझील व जर्मनीने अशी कामगिरी केली होती. रॉड्रीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या स्पेनने यंदा साखळी फेरीत ह-गटातून अग्रस्थानासह आगेकूच करताना सौदी अरेबिया व उरुग्वे संघांना धूळ चारली तर केप व्हर्डेविरुद्ध बरोबरी पत्करली. त्यानंतर बाद फेरीत (राऊंड ऑफ ३२) ऑस्ट्रियाला ३-० असे पराभूत केले. उपउपान्त्यपूर्व लढतीत रोनाल्डोच्या पोर्तुगालचा स्वप्नभंग करताना १-० असा विजय मिळवला. या पाचही लढतींत स्पेनने एकही गोल स्वीकारला नव्हता. उपान्त्यपूर्व फेरीत बेल्जियमविरुद्ध त्यांनी २-१ असा विजय मिळवला मात्र, गोल न खाण्याची मालिका खंडित झाली. स्पेनने २०१० नंतर प्रथमच उपान्त्य फेरी गाठली.

स्पेनचा गोलरक्षक सिमॉनसह अन्य बचावपटूंना भेदण्यात बेल्जियम व्यतिरिक्त कोणालाही यश मिळाले नव्हते. त्यामुळे स्पेनच्या बचावफळीविरुद्ध फ्रान्सच्या आक्रमकांचा कस लागणार होता. मंगळवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात स्पेनने जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणा-या फ्रान्सचा २-० असा पराभव केला. या शानदार आणि नियंत्रित कामगिरीच्या जोरावर स्पेनने फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला.सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्पेनने चेंडूवर नियंत्रण ठेवले. मिकेल ओयारझाबाल याने मिळालेल्या पेनल्टीवर पहिला गोल करून स्पेनचे खाते उघडले. उत्तरार्धात पेड्रो पोरो याने दुसरा गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. एम्बाप्पे, उस्मान डेम्बेल, मायकल ओलीस ही फ्रान्सची आक्रमक फळी स्पेनच्या शिस्तबद्ध बचावासमोर पूर्णपणे हतबल ठरली. स्पेनला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात गोलकीपर उनाई सायमनचा अभेद्य बचाव आणि यंग सेन्सेशन १९ वर्षीय यमालचा खेळ कारणीभूत ठरला. सायमनने एम्बाप्पेचे धोकादायक हल्ले उधळून लावले तर तरुण खेळाडू यमालच्या पदलालित्यामुळे स्पेनला पहिली पेनल्टी मिळाली शिवाय त्याने आक्रमणासोबतच उत्कृष्ट बचावही केला. संपूर्ण स्पर्धेत स्पेनच्या बचावफळीने एकमेव गोल स्वीकारला आहे. अंतिम फेरीत दाखल होणारा स्पेन हा पहिला संघ ठरला आहे. अर्जेंटिना आणि इंग्लंड संघात उपान्त्य फेरीचा दुसरा सामना होणार आहे.

बुधवारी मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार गुरुवारी १२.३०) होणा-या या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अ‍ॅटलांटा स्टेडियमवर रंगणा-या या लढतीत लिओनेल मेस्सी विरुद्ध हॅरी केनचे कडवे आव्हान असेल. गतविजेत्या अर्जेंटिनाने साखळीत सलग तीन विजय मिळवताना अल्जेरिया, ऑस्ट्रिया व जॉर्डन संघांना धूळ चारली होती. त्यानंतर राऊंड ऑफ ३२ मध्ये केप व्हर्डे आणि उपउपान्त्य फेरीत ईजिप्तविरुद्ध ३-२ असा विजय मिळवला होता. उपान्त्यपूर्व सामन्यात अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ अशी मात केली होती. अर्जेंटिना गत काही सामन्यांत २ ते ३ गोल करत असला तरी १-२ गोलही खात आहे. म्हणजेच त्यांचा बचाव कमकुवत आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध अर्जेंटिनाच्या बचावफळीचा कस लागेल. अर्जेंटिनाने विश्वचषकातील सलग १२ सामन्यांत दोन किंवा त्याहून अधिक गोल केले आहेत. त्यांनी उरुग्वेचा ७४ वर्षांपूर्वीचा ११ सामन्यांचा विक्रम मोडला आहे. १९६६च्या विजेत्या इंग्लंडने साखळीत क्रोएशिया व पनामाला हरवले तर घानाविरुद्ध बरोबरी पत्करली. बाद फेरीत काँगोविरुद्ध २-१ तर मेक्सिकोविरुद्ध ३-२ असा विजय मिळवला. उपान्त्यपूर्व फेरीत नॉर्वेला २-१ असे नमवून चौथ्यांदा उपान्त्य फेरीत प्रवेश केला. अर्जेंटिनाने १९८६ मध्ये उपान्त्यपूर्व फेरीत दिएगो मॅराडोनाच्या ‘हॅण्ड ऑफ गॉड’ गोलद्वारे इंग्लंडला पराभूत केले होते. त्या पराभवाचे शल्य इंग्लंडच्या चाहत्यांच्या मनात आजही कायम असेल. आता इंग्लंड त्या पराभवाची सव्याज परतफेड करणार की अर्जेंटिना सलग दुस-यांदा अंतिम फेरीत धडक मारणार याची जगभरातील फुटबॉलप्रेमींना उत्सुकता आहे.

इंग्लंडचा कर्णधार केनने यंदाच्या स्पर्धेत ६ गोल केले असून तो ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत तिस-या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा मध्यरक्षक बेलिंघमसुद्धा फॉर्मात येतोय. अर्जेंटिनाने सहाव्यांदा तर इंग्लंडने चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठली आहे. विश्वविजेतेपद टिकवायचे अर्जेंटिनाचे स्वप्न आहे तर सहा दशकांनंतर पुन्हा विश्वचषक जिंकण्याची इंग्लंडची महत्त्वाकांक्षा आहे. अर्जेंटिना आणि इंग्लंडमध्ये विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. फॉकलंड बेटावरून दोन्ही देशांत वाद आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान लढती जशा गाजतात तशा अर्जेंटिना-इंग्लंड लढतीही गाजतात. अर्जेंटिनाचे कोच स्कालोनी यांनी मात्र या ऐतिहासिक पार्श्वभूमीला फारसे महत्त्व दिलेले नाही. हा फक्त फुटबॉलचा सामना आहे एवढाच विचार आम्ही करतो असे ते म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:57
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
24:13
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53

Latest news