24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाकमध्ये गृहयुद्धाचा भडका; २३ सैनिक, ९ बंडखोर ठार

पाकमध्ये गृहयुद्धाचा भडका; २३ सैनिक, ९ बंडखोर ठार

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्य आणि बलुच बंडखोरांमध्ये मोठी झटापट झाली आहे. वेगवेगळ्या झटापटीत पाकिस्तानी सैन्याचे २३ जवान मारले गेले तर या संघर्षात बलूच लिबरेशन आर्मीचे ९ जवान ठार झाल्याचे पुढे आले आहे. बलूच लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते जायंद बलूच यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यात गोनी पारानजीक झालेल्या संघर्षात पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरद्वारे कमांडो उतरवायला लागल्याचे सांगण्यात आले.

बलुचिस्तानात बंडखोर सशस्त्र समुहाविरोधात पाकिस्तानी सैन्याचे अभियान सुरू आहे. पाकिस्तानी सैन्याने मोठ्या संख्येने जवानांना बलुचिस्तानात उतरवले आहे, तरीही बलुचिस्तानातील बंडखोर भारी पडत आहेत. मागील काही दिवसांपासून बलुच बंडखोरांना मिळणा-या यशाने पाकिस्तानी सैन्य खवळले आहे. त्यातूनच तिथल्या नागरिकांविरोधात सैन्याने क्रूर अभियान सुरू केले. बलुचिस्तानात पुन्हा एकदा लोक अचानक गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

बलुचिस्तानात २ वेगवेगळ्या ठिकाणांहून ९ लोकांना बळजबरीने गायब करण्यात आले आहे. पासनीजवळ सुरक्षा जवानांनी २ जणांना ताब्यात घेतले आणि अज्ञात स्थळी नेले असे बलूचिस्तान पोस्टमध्ये रिपोर्ट आला आहे. तसेच पाकिस्तानी सैन्याने केचमध्ये बालनिगोर जिल्ह्यात छापेमारी आणि शोध अभियान सुरू केले आहे. त्यात ७ युवकांना ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी नेले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR