26 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रपाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण

पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण

सातारा : लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा हा संविधान बचाव आहे. स्वातंत्र्यापूर्वी आमची काय परिस्थिती होती. त्यामुळे संविधान आम्ही बिलकूल जाऊ देणार नाही. या निवडणुकीतील लढाई या पाच मुद्यांवर असून, हे राष्ट्रीय मुद्दे आहेत.

त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिले पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. क-हाड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. मोदी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात या पाच मुद्यांवर काहीच बोललेले नाहीत. त्यांचा आता ध्रुवीकरणाचा प्रचार चाललाय. यंदाची निवडणूक मला आणीबाणीनंतरच्या १९७७ मधील निवडणुकीसारखी वाटतेय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्थव्यवस्थेचे संचालन करण्यात अपयश आलेले आहे. त्यामुळे महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतमालाचे दर वाढायला लागले की बाहेरून माल आयात करायचा आणि दर पाडायचे. हे कशाकरिता चालले आहे?, अशा धोरणामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्याबद्दलच्या प्रश्नावर बोलताना आम्हीही त्यांना उमेदवारीबद्दल विचारणा केली होती; पण ते नाही म्हणाल्याचा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR