पामतेलासह ३ कोटींचे खाद्यतेल जप्त

संभाजीनगरमध्ये एफडीएची ऑईल कंपन्यांवर धाड
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या महिनाभरापासून कारवाईंचा धडाका लावला असून गावखेड्यातल्या पानपट्टीपासून ते बड्या कंपन्यांपर्यंत अधिकारी पोहोचले आहेत. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी या विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून कारवाईला वेग आला असून दूध भेसळ, हॉटेल्स, मेडिकलसह इतरही ठिकाणी विभागाने धाडी टाकत कारवाई केली. दरम्यान, आज खाद्यतेल कंपनीवर छापा टाकून तब्बल ३ कोटींचा माल जप्त केला.

छत्रपती संभाजीनगर येथे खाद्यतेलाच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अन्न व औषध प्रशासनाने २ ऑईल रिपॅकिंग युनिट्सवर धाड टाकून तब्बल २ कोटी ९३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा संशयित निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला. कारवाईदरम्यान अस्वच्छ वातावरण, वापरलेले डबे पुन्हा वापरणे, फूड ग्रेड प्रमाणपत्रांचा अभाव आणि प्रयोगशाळेशिवाय तेलाचे पॅकिंग अशा गंभीर त्रुटी उघड झाल्या. या दोन्ही आस्थापनांचे परवानेही तात्काळ निलंबित करण्यात आले.

२ ऑईल कंपन्यांवर छापा
सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ११ जुलै रोजी पैठण येथील बागरिया अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील बागरिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स या २ ऑईल रिपॅकिंग युनिट्सवर अचानक छापा टाकला. त्यावेळी अस्वच्छ परिस्थितीत खाद्यतेलाचे रिपॅकिंग सुरू असल्याचे आढळून आले.

पामतेलासह विविध खाद्यतेल जप्त
कारवाईत पाम, सोयाबीन, कपाशी आणि अज्ञात वनस्पती तेलासह एकूण २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपयांचा संशयित निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. पुढील तपासासाठी तेलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news