27.8 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeलातूरपालकमंत्री भोसले यांनी लातूरच्या प्रकल्पना निधी उपलब्ध करुन द्यावा

पालकमंत्री भोसले यांनी लातूरच्या प्रकल्पना निधी उपलब्ध करुन द्यावा

लातूर :  प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी  दि. २९ जानेवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची  मुंबई येथे भेट घेतली. लातूरचे पालकमंत्री म्हणून  निवड झाल्याबद्दल त्यांचे स्वागत करुन अभिनंदन केले. नव्या उमेदीच्या नेतृत्वाकडे प्रगतीच्या वाटेवर असलेल्या लातूरचे पालकमंत्रीपद आल्यामुळे, या जिल्ह्याच्या विकासाला आणखीन गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करून संपूर्णत: सहकार्याच्या ग्वाहीसह त्यांना शुभेच्छाही दिल्या.
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भेटीत लातूरच्या विकासासह विविध विषयावर चर्चा झाली. यामध्ये लातूर हे मराठवाड्यातील सर्वाधिक गतीने विकसित होणारे शहर आहे, त्यामुळे शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे, ही बाब लक्षात घेऊन प्रस्तावित बा  वळण रस्ता बांधकामासाठी आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणा-या पु. अहिल्याबाई होळकर चौक (नवीन रेणापूर नका) ते जिवाजी महाले चौक (गरुड चौक) या मार्गाचे सहा पदरीकरण करण्याची करण्याची मागणी करण्यात आली. लातूर रेल्वे स्थानक ते बा  वळण (रामामा क्र.५४८) रस्त्यादरम्यान  वाढलेली वाहतूक लक्षात घेता या रस्त्याचे दुभाजक व प्रकाश व्यवस्थेसह सहा पदरीकरण करावे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पटेल चौक येथील विस्तारित स्त्री व बाल रुग्णालय बांधकामासाठी महानगरपालिकेच्या जागेचे त्वरित हस्तांतरण करावे.
लातूरच्या उद्योग व्यापार वाढीच्या दृष्टीने लातूर विमानतळाच्या विस्तारनकरणाचे काम त्वरित पूर्ण करुन उड्डाण योजनेतून विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत,  लातूर जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे त्वरित हस्तांतरण करून रुग्णालयाची लवकरात लवकर उभारणी करावी, लातूर शहरातील विलासराव देशमुख मार्गाच्या दुस-या टप्प्यातील कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, लातूर शहराच्या प्रगतीचा वेग आणि विस्तार लक्षात घेता शहरातील प्रमुख चौक व रस्त्याचे सुशोभीकरण त्याचबरोबर सीसीटीव्ही आणि सिग्नल व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यासह लातूर शहर व जिल्ह्यातील विविध नियोजित आणि काम चालू असलेल्या प्रकल्पासाठी निधीची मागणी यावेळी त्यांच्याकडे केली, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सोबत सदरील भेटीतील चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. लातूरच्या प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी बोलताना दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR