26.9 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeराष्ट्रीयपालघरजवळ मालगाडी घसरली

पालघरजवळ मालगाडी घसरली

रेल्वेचे मोठे नुकसान, वाहतूकही विस्कळीत
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मार्गावर पालघरजवळ रेल्वेच्या मालगाडीला अपघात झाला. या मालगाडीवरून वाहतूक करण्यात येणारे लोखंडी रोल रुळावर पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

गुजरातहून मुंबईकडे जाणा-या मालगाडीचे काही डबे पालघरजवळील मार्गावर पलटी झाले आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गावरील ट्रॅक नंबर एक आणि दोन प्रभावित झाले आहेत. मालगाडीचे डबे पूर्ववत करण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले. गुजरातहून मुंबईकडे ही मालगाडी जात असताना पश्चिम रेल्वेच्या मार्गावर पालघरजनीक हा अपघात झाला. अपघातामुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले असून रेल्वे रुळाजवळील इलेक्ट्रीक पोलही आडवा झाल्याचे दिसून येत आहे. मालगाडीतून वाहतूक करण्यात येत असलेल्या सामानाचेही नुकसान झाले असून अपघातानंतर रेल्वे स्थानकातील प्रवाशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर रेल्वेचे गार्डही घटनास्थळी धावत आले असून संबंधित रेल्वे कर्मचा-यांना मालगाडी पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR