20.9 C
Latur
Wednesday, November 13, 2024
Homeलातूरपिळवणूक करणा-या महायुती सरकारला सत्तेवरुन खेचा 

पिळवणूक करणा-या महायुती सरकारला सत्तेवरुन खेचा 

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
स्वत:ला चारित्र्यसंपन्न म्हणत सत्ता काबीज केली मात्र पूर्वीची भाजपा आता राहीलेली नाही. लालकृष्ण अडवाणी सारख्या नेत्यांना याच मंडळींनी घरी बसवले त्यामुळे आता नकली भाजप राहिलेली आहे राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारमधील लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे विकासाच्या नव्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी कोंग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांना निवडून द्यावे असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.
रविवारी सायंकाळीं निलंगा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंखे यांच्या प्रचारार्थ महात्मा बसवेश्वर चौक शिरूर अनंतपाळ येथे जाहिर सभेत  ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते अ‍ॅड. संभाजीराव पाटील हे होते. या प्रसंगी खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, (राष्ट्रवादी शरद पवार) जिल्हाध्यक्ष संजय शेटे, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, अल्पसंख्यांक नेते हमीद शेख, अजीत माने, डॉ. अरंिवद भातांब्रे, जयेश माने, प्रभाकर बंडगर, लाला पटेल, व्यंकटराव पाटील, एल.बी. आवाळे, अविनाश रेशमे, राम गायकवाड भागवत वंगे, अंबादास जाधव, हरिराम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, जिल्हा बँक, जागृती शुगरच्या माध्यमातून या तालुक्यातील शेतक-याना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले. स्वच्छ व पारदर्शक कारभार करीत काँग्रेस पाठीशी राहिली असतानाही जाणीवपूर्वक त्रास बदनामी करण्याचा प्रयत्न या भागातील लोकप्रतिनिधी करीत आहेत त्याचा हिशोब विधानसभा निवडणुकीत आपल्याला करावा लागणार आहे. गेली दहा वर्षे झाले या भागात विकासाचे प्रश्न कुठलेच मार्गी लागले नाहीत. तालुका असूनही क्रीडा संकुल नाही, ग्रामीण रुग्णालय नाही, कोर्ट नाही याकडे लक्ष वेधत यापुढे ही विकासाची गंगा आपल्याकडे येण्यासाठी कोंग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांना आशिर्वाद द्यावेत, अशी विनंती करत विकासचे काम माझ्यावर सोडा लातूरच्या धर्तीवर आपण या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न करू असे सांगून आगामी काळात आपले सरकार सत्तेवर येणार असून त्या दृष्टीने आपला आमदार असला पाहिजे त्यासाठी विचार पक्का करून काँग्रेसला साथ द्यावी अभय साळुंके यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, शिवसेनेचे भागवत वंगे, संजय बिराजदार, रामकिशन गड्डीमे,पी.एस. कदम,पंडीत लवटे,अकबर तांबोळी,रमेश सोनवणे,मधुकर जाधव, जगदिश सुर्यवंशी, पंकज शेळके, मीनाताई बंडले,सुधीर लखनगावे, वैशंपायन जागले, गणेश गुराळे, बसवराज मठपती, बाळासाहेब पाटील,प्रमोद भदरगे,महादेव आवाळे, भरत शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, शितलताई सोनवणे यांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR