पोलिस महासंचालक दातेंनी घेतला आषाढी वारी बंदोबस्ताचा आढावा

पंढरपूर : तालुका प्रतिनिधी
राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आगामी कालावधीमध्ये होत असलेल्या आषाढी वारी २०२६ च्या अनुषंगाने भेट दिली. यावेळी त्यांनी पंढरपूरात आषाढी वारीच्या संदर्भाने जिल्ह्यामध्ये वाटचाल करत असलेल्या संताच्या पालख्या, दिंडी व पंढरपूर येथील वारी बंदोबस्ताच्या अनुषंगाने आढावा घेतला.

पोलिस महासंचालक यांनी पुणे येथून वाहनाने निघून पुणे ग्रामीण, सातारा व सोलापूर ग्रामीण हद्दीतील पालखी मार्गाची पाहणी करून संबंधीत विभागाचे अधिकारी यांना सुरक्षेसाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर मुक्ताई पोलिस संकुल पंढरपूर येथे आयोजीत केलेल्या आढावा बैठकीमध्ये जिल्हा प्रशानाकडून आषाढी वारीच्या संदर्भाने वारी करीता येणारे भाविकांची संख्या, त्यांना शासनाकडून पुरविण्यात येणार्या सुविधा, सुरक्षा याबाबतची माहिती घेतली. तसेच जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर येथे सुरू केलेल्या एकात्मिक नियंत्रण कक्ष बाबत माहिती घेतली. तसेच आषाढी वारी संदर्भाने पोलिस विभागाकडून लावण्यात येत असलेल्या बंदोबस्ताबाबतची माहिती घेऊन आवश्यक ठिकाणी सुधारणा करण्याबाबत आदेश दिले आहेत.

दरम्यान त्यांनी श्री. विठ्ठल रूक्मीणी मंदीर परीसर, महाद्वार चौक, वाळवंट या भागात पायी चालत फिरून या भागात दर्शनासाठी येणारे भावीक, तेथील गर्दीचे नियंत्रण याबाबत बारकाईने माहिती घेतली आहे. तसेच बंदोबस्तामध्ये आवश्यक सुचना देऊन त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत आदेशीत केले आहे.

मुक्ताई पोलिस संकुल, पंढरपूर येथे आयोजीत केलेल्या आढावा बैठकीस शिरीष जैन, आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यासह रंजनकुमार शर्मा विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर, कार्तिकेयन एस जिल्हाधिकारी, सोलापूर, अतुल कुलकर्णी पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व विजय कबाडे अपर पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, मंदीर समिती, रेल्वे विभाग व नगरपरिषद पंढरपूर येथील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news