लातूर : प्रतिनिधी
पोहरेगाव बराजच्या गेटला तांत्रिक अडचणींमुळे पाण्याची गळती होत होती. ही गळती थांबवण्यासाठी शेतक-यांनी जलसंपदा विभागाकडे वारंवार मागणी केली, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. अखेर रामेश्वर येथील शेतकरी शरद रामकृष्ण पाटील यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे या समस्येबाबत तक्रार केली. आमदार अमित देशमुख यांनी तात्काळ जलसंपदा विभागाला दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. तसेच, या कामावर लक्ष ठेवण्यासाठी आपले प्रतिनिधी पाठवले. त्यांच्या सूचनेनुसार, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पोहरेगाव बराज येथे पोहोचले आणि त्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण केले.
शरद रामकृष्ण पाटील पोहरेगाव बराजला तांत्रीक अडचणी आल्याने पाण्याची गळती होणार होती. ही पाणी गळती थांबविण्यासाठी पोहरेगाव बराजची दुरुस्ती आवश्यक होती. ही दुरुस्ती झाली नाही तर पाणी आल्यानंतर पाणी गळती होईल यासाठी शेतक-यांनी संबंधित अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. पण दखल न घेतल्याने रामेश्वर येथील शेतकरी शरद रामकृष्ण पाटील यांनी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना पोहरेगाव बराजच्या गेटला तांत्रीक कारणाने होत असलेली गळती पाणी येण्यापूर्वी थाबवण्याची विनंती केली. यावर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जलसंपदा विभागाला तात्काळ दुरुस्तीसाठी सुचना केल्या, हे काम वेळेवर पूर्ण होण्यासाठी विलास कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, संचालक कैलास पाटील पदाकारी यांचे शिष्टमंडळ जागेवर पाहणी करण्यास पाठवीले.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सुचनेची तातडीने दखल घेऊन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमर पाटील, विभागाचे कनिष्ठ अभियंता अमर गिरी व सहाय्यक गणेश सोनटक्के यांनी पोहरेगाव बराज येथे जाऊन गेट दुरुस्ती करुन होणारी गळती थांबविण्यासाठी आवश्यक कामे केली. या झालेल्या कामाबाबत शेतकरी शरद पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, दशरथ केसरे, अभिजीत केसरे, विशाल मोरे, राजाभाऊ मोरे आणि नाना देशमुख यांनी समाधान व्यक्त केले तसेच माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि जलसंपदा विभागाचे आभार मानले.