लातूर : प्रतिनिधी
येथील मांजरा महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन प्रियंका सुरवसे यांना सांगलीच्या ए. डी. फाऊंडेशनच्या वतीने पुणे येथे आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या हस्ते महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी त्यांनी हजारो महिलांना सहकार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शोभाताई पाटील, रागिणीताई यादव, रोहिणीताई धायगुडे, सविताताई जाधव व संस्थेच्या संचालक मंडळाने कौतूक केले आहे.

