लातूर शहर महापालिका प्रभाग क्रमांक-४ – मनपा यंत्रणेनेच केले ग्रीन बेल्टचे कचरा बेल्ट

मोकळ्या जागेचा गैरवापर, नागरिक त्रस्त

लातूर (प्रतिनिधी ) : शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये समस्याच समस्या आहेत़ या प्रभागात एकमेव असलेल्या ग्रीन बेल्टचा लातूर शहर महानगरपालिका घन कचरा व्यवस्थापनच्या यंत्रणेने कचरा बेल्ट करुन टाकला आहे़ त्यामुळे नागरिकांना मॉर्निग वॉकसाठी श्री विलासराव देशमुख पार्क(नाना-नानी पार्क) किंवा थेट रिंग रोडवर जावे लागते़ कचरा, गटारींची स्वच्छता, गटारीतून काढलेला कचरा न उचलणे आदी समस्याही मोठ्या प्रमाणात असल्याचे या प्रभागातील नागरिकांनी ‘एकमत’च्या विशेष कार्यक्रमात सांगीतले.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये आनंदनगर, संजयनगर, इंद्राळेनगर, इस्लामपूरा, न्यु़ काझी मोहल्ला हा भाग येतो़ आनंंदनगरमध्ये बहुतांश ठिकाणी गटारी व रस्त्यांची कामे झालेली आहेत़ परंतु, गटारी सतत तुंबलेल्या असतात़ त्यामुळे गटारीतील घाण पाणी रस्त्याने वाहत असते़ सर्वात महत्वाचे म्हणजे, पोलीस वसाहतीत आता एक-दोनच पोलीस राहात आहेत़ पुर्ण वसाहत मोडकळीस आलेली आहे़ या वसाहतीच्या बाजूच्या ग्रीन बेल्टमध्ये या भागातील कचरा जमा केला जातो़ कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला की, तो मोठ्या गाड्यांनी कचरा डेपोला रवाना केला जातो़ घंटागाडीवाल्यांनी ग्रीन बेल्टमध्ये मिनी कचरा डेपो केल्याने या भागात मोकाट श्वान आणि डुकरांचा वावर वाढला आहे़ कचºयामुळे डासांचे प्रमाण वाढले़ आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे पोलीस वसाहतीत कोणीच राहात नाही़ संपूर्ण वसाहतीची जागा मोकळी आहे़ या जागेत टूकार तरुण रात्री ते मध्यरात्रीपर्यंत बसलेले असतात़ दारु पिणे, गांजा ओढणे, अवैध धंदे सुुरु असतात़ गुंडगिरी सुरु आहे़ मोकळ्या जागेचा गैर वापर होतो आहे़ त्याचा या परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे़ मोडकळीस आलेली पोलीस वसाहत पाडून तिथे नवीन वसाहत निर्माण केली तरच या भागातील कचºयाचा प्रश्न सूटेल आणि मोकळ्या जागेचा गैरवापरही थांबेल, असे राजकुमार चिथाडे यांचे म्हणणे आहे.

संजयनगरमध्येही कचºयाची समस्या आहे़ इस्लामपुरामधील नाल्याची अडचण असल्याचे विशाल भोरे म्हणाले़ इंदिरानगरकडून आलेल्या या नाल्याच्या पाण्यात कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, घाण इस्लामपुºयात येते़ पावसाळ्यात या नाल्याचे पाणी थेड घरांत शिरते़ घरात गुडघाबर पाणी साचते़ त्यामुळे रात्र-रात्र जागुन काढण्याची वेळ येते़ सुमारे १०० घरांची ही मोठी अडचण आहे़ नगरसेवक नसल्याने तर अधिकच अडचणीत भर पडली़ महानगरपालिका प्रशासनाने आमची घरे पाडून त्या ठिकाणी मुरुम टाकून उंचावर आमची घरे बांधून द्यावीत, अशी अपेक्षा विशाल भोरे यांनी व्यक्त केली.

इंद्राळेनगर, अंजलीनगरमधील आसिफ जाफर शेख म्हणाले, गटारी साफ केल्या जातात़ गटारीतील घाण काढून गटारीच्या कडेला टाकली जाते़ परंतु, ती घाण चार, पाच दिवस उचलली जात नाही़ परिणामी संपूर्ण परिसरात दुर्गंधी सुटलेली असते़ सुरैया पठाण म्हणाल्या, नालीच्या मधोमध विजेचे एक खांब आहे़ इंदिरानगरकडून आलेली घाण, कचरा पुढे न जाता या खांबामुळे अडतो़ दुर्गंधी सुटते़ हा खांब काढावा, असे त्यांचे म्हणणे आहे़ सिकंदर शेख यांनी सांगीतले की, नळाला येणारे पाणी अपुरे असते़ एका वर्षापासून बोअर बंद अवस्थेत आहे़ मनपा प्रशासनाला सांगुनही बोअरची दुरुस्ती झाली नाही़ परिणामी या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59
Video thumbnail
Parbhani|थारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा खुनाचा आरोप
03:58
Video thumbnail
शिवीगाळीनंतरही मोदींचा संयम; 'भरकटलेल्यांना योग्य मार्ग दाखवणं आपलं कर्तव्य'
03:06
Video thumbnail
Latur|छत्रपती शिवाजी महाराज चौक–दयानंद गेट रस्ता जलमय; वाहनचालकांना करावी लागतेय सर्कस
03:16
Video thumbnail
Latur Police Student Dialogue 2.0 | २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांशी पोलीस साधणार थेट संवाद
06:41
Video thumbnail
Latur News | छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भुयारी मार्ग धोकादायक, नागरिकांचा संताप
03:51
Video thumbnail
Latur|सीताराम नगरात रस्ते जलमय; खड्ड्यांमुळे अपघात वाढले,मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
02:45
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54

Latest news