लातूर : प्रतिनिधी
लातुर फिजिशियन असोशिएशनच्या अध्यक्षपदी येथील गायत्री हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध श्वसन विकार तज्ज्ञ डॉ रमेश भराटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लातूरच्या फिजिशियन संघटनेचे जवळपास २०० डॉक्टर्स सदस्य आहेत. नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली व या सभेत डॉ. रमेश भराटे यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिव म्हणून डॉ. हमीद चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी डॉ. रमेश भराटे यांनी फिजिशियन असोसिएशन ही मधुमेह, दमा, रक्तदाब, किडनी विकार, पॅरालिसिस, रक्त दोष, कॅन्सर या आजारांवर नवीन उपचार पद्धती व संशोधन या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार असल्याचे नमूद केले.
या विषयावर विभागीय व राज्यस्तरीय परिषद लवकरच लातूर येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांना माफक दरात चांगल्या दर्जाच्या सुविधा व उपचार मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. रमेश भराटे यांनी सांगितले. यावेळी डॉ. राजेश पाटील, डॉ. अशोक गानू, डॉ. पी. आर. तोषणीवाल, डॉ. रायभोगे, डॉ. विद्याधर मस्के पाटील, डॉ. चेतन सारडा, डॉ. शीतल पाटील, डॉ. गणेश पाटील, डॉ. दरक व इतर डॉक्टर उपस्थित होते. डॉ. रमेश भराटे यांच्या निवडीबद्दल त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.