लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात प्रवासी वाहतूक करणारे ऑटोचालक मोठ्या प्रमाणात ड्रायव्हर सीटवर प्रवासी बसवून (फ्रंटसीट) प्रवाशांची वाहतूक करतात, अशा ऑटोचालकाविरूद्ध लातूर पोलिसांनी मो ठ्या प्रमाणात मोहीम हाती घेतली आहे. ऑटोमध्ये नियमानुसार अधिकचे प्रवाशी बसवून प्रवास करतातच करता पण चालकाच्या सीटवर दोन्ही बाजूने प्रवाशी वाहून नेले जाते. अशा ऑटोचालका विरूद्ध पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये धडक मोहीम चालू आहे.
रविवारी दिवसभरात शिवाजीनगर पोलिसांनी सुमारे २५ फ्रंटसीट ऑटो चालकाविरूद्ध कारवाई केली आहे. याच दरम्यान फटाका सायलन्सर काढून घेण्यात आले आहे. शहरातील ट्रॉफीक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यात प्रामुख्याने शहरातील चौकापासून ५० मीटरपर्यंत ऑटो न थांबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. चौकात ऑटो उभे केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चालकाच्या शेजारी प्रवाशी बसवून वाहतूक केली जाते. रेल्वे स्टेशनकडे जाणारे, ईतरही मार्गावर तर एखाद्या जीपमध्ये बसतील एवढे प्रवाशी ऑटोमध्ये असतात, संध्याकाळी रेल्वे स्टेशनकडे जाणारे ऑटोवर चालकाच्या शेजारी तीन-तीन जण बसलेले असतात, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे ऑटोचालक तर रिस्क घेऊन मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची ने-आण करतात. पोलिसांनी मोहीम हाती घेतलीच आहे तर अशा बेशिस्त ऑटोवर आळा बसणार आहे.